कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2024
- 359
मुंबई : डिसेंबरमध्ये बहुतांश लोक हे बाहेरगावी जाण्याचे नियोजन करत असतात. सरत्या वर्षाला निरोप देवून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे डेस्टिनेशन निवडून सेलिब्रेशन केले जाते. त्यात नाताळच्या सुट्या असल्याने गोव्याच्या किनारी, कोकणात, दक्षिण भारतात साजरा करण्याचे अनेकांचे नियोजन असते. सलग सुट्ट्यांच्या कालावधीतील गद आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते करमळी, कोचुवेली आणि पुणे ते करमळी दरम्यान 48 विशेष रेल्वेगाड्या धावतील. सीएसएमटी-करमळी-सीएसएमटी दैनंदिन विशेष 34 रेल्वेगाड्या धावतील.
गाडी क्रमांक 01151 विशेष 20 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत सीएसएमटी येथून दररोज रात्री 12.20 वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01152 विशेष 20 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत करमळी येथून दररोज दुपारी 2.15 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी रात्री 3.45 वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवि येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, तीन द्वितीय वातानुकूलित, 11 तृतीय वातानुकूलित, 2 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेजसह गार्ड्स ब्रेक व्हॅन असे डबे असतील.
एलटीटी-कोचुवेली एलटीटी साप्ताहिक विशेष 8 रेल्वेगाड्या धावतील. गाडी क्रमांक 01463 विशेष एलटीटी येथून 19 डिसेंबर ते 9 जानेवारीपर्यंत दर गुरुवारी सायंकाळी 4 वाजता सुटेल आणि कोचुवेली येथे दुसऱ्या दिवशी रात्री 10.45 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01464 विशेष 21 डिसेंबर ते 11 जानेवारीपर्यंत दर शनिवारी कोचुवेली येथून सायंकाळी 4.20 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे तिसऱ्या दिवशी 12.45 वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मूकनबिका रोड, बाय कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, ठोकूर, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर, थ्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिकारा, कायनकुलम आणि कोल्लम येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान, 3 सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असे डबे असतील.
पुणे-करमळी-पुणे साप्ताहिक विशेष 6 रेल्वेगाड्या धावतील
गाडी क्रमांक 01408 विशेष रेल्वेगाडी 25 डिसेंबर ते 8 जानेवारीपर्यंत दर बुधवारी पहाटे 5.10 वाजता पुणे येथून सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी रात्री 8.25 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01408 विशेष रेल्वेगाडी 25 डिसेंबर ते 8 जानेवारीपर्यंत दर बुधवारी करमळी येथून रात्री 10.20 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला एक वातानुकूलीत प्रथम श्रेणी, एक द्वितीय वातानुकूलीत, 2 तृतीय वातानुकूलीत, 5 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेजसह गार्ड्स ब्रेक व्हॅन असतील. या रेल्वेचे आरक्षण विशेष शुल्कासह 14 डिसेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai