Breaking News
मुंबई : देशातील महत्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या ‘सीए’ अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून 11 हजार 500 विद्याथ हे ‘सीए’ म्हणून पात्र ठरले आहेत. सीए अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपचा निकाल 16.8 टक्के, दुसऱ्या ग्रुपचा निकाल 21.36 टक्के लागला. तर दोन्ही ग्रुप मिळून निकाल टक्के 13.44 टक्के लागला आहे.
हैदराबादमधील हेरंब महेश्वरी आणि तिरुपती येथील ऋषभ ओसवाल यांनी 84.67 टक्के (508 गुण) मिळवत संपूर्ण देशातून पहिला येण्याचा बहुमान पटकावला. त्यानंतर अहमदाबाद येथील रिया शाह हिने 83.50 टक्के (501 गुण) मिळवत द्वितीय स्थान आणि कोलकत्ता येथील किंजल अजमेरा हिने 82.17 टक्के (493 गुण) मिळवत तिसरे स्थान पटकावले.
‘देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होणे, हे आयुष्यातील खूप मोठे यश आहे. ’सीए’ होणे हा तुमच्या दृढनिश्चयाचा, त्याग आणि कठोर परिश्रमाचा एक शक्तिशाली पुरावा आहे. या संपूर्ण वर्षात 31 हजार 946 हून अधिक विद्याथ हे ‘सीए’ अंतिम परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले, यावरून ‘सीए’ परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांची आवड आणि मेहनत लक्षात येते. मी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो’, असे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे संचालक सीए रणजीत कुमार अग्रवाल यांनी सांगितले.
दरम्यान, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2024 मध्ये ‘सीए’ अंतिम परीक्षा ही 443 केंद्रांवर घेण्यात आली होती. तब्बल 1 लाख 1 हजार 430 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि 11 हजार 500 विद्याथ ‘सीए’ म्हणून पात्र ठरले. ‘सीए’ अंतिम परीक्षेतील पहिल्या ग्रुपमधून 66 हजार 987 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 11 हजार 253 विद्याथ उत्तीर्ण झाले. तर, दुसऱ्या ग्रुपमधून 49 हजार 459 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 10 हजार 566 विद्याथ उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुप मिळून 30 हजार 763 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 4 हजार 134 विद्याथ उत्तीर्ण झाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai