घसघशीत रिटर्न्सच्या नादात टोरेस लूट
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 14, 2025
- 269
नवी मुंबई : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह आसपासच्या परिसरातील शाखा उघडून नागरिकांची कोट्यावधींची लुट करुन टोरेस कंपनीने एक मोठा आर्थिक घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्टिफिशल डायमंड विकणाऱ्या टोरेस कंपनीने लोकांना आठवड्याला 6 टक्क्यांपासून 10 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला कंपनीकडून काही परतावा देण्यात आला. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच परतावा न मिळाल्याने हा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी मुंबईत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुंतवणूकदारांना मोठं आमिष दाखवत गुंतवणूक करा आणि व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असे आवाहन टोरेस लिमिटेड कंपनीने केले होते. मॅफकोमार्केटच्या समोर त्यांनी आपलं कार्यालय थाटलं होतं. त्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षात दुप्पट, सात वर्षात तीनपट आणि 10 वर्षामध्ये चौपट रक्कम देण्याचे सांगितलं. शिवाय दर महिन्याला विशिष्ठ व्याजही गुंतवणुकदारांच्या खात्यात जमा होईल असंही सागंण्यात आलं. येवढ्या आकर्षक योजनेला कुणाची भुरळ पडणार नाही? नेमकं तसचं झालं. या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मुंबई आणि उपनगरातल्या जळपास 3 लाख लोकांनी यात गुंतवणूक केली.
या कंपनीचे मुख्य ऑफीस हे दादर ला आहे. शिवाय भाईदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असणाऱ्या आर्टिफिशल डायमंड विक्री करणाऱ्या टोरेस नामक कंपनीच्या मार्फत लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यातून अनेकांनी गुंतवणूक केली होती. पण दादर येथील मुख्य कार्यालय अचानक बंद झाले. शिवाय मीरा भाईंदरमधील शोरूम देखील बंद करण्यात आले. ही दोन्ही कार्यालय बंद झाल्याची माहिती गुंतवणुकदारांना मिळाली. त्यांनी तातडीने या कार्यालयांकडे धाव घेतली.
दोन्ही कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी गद करत आक्रोश केला. या गोंधळानंतर पोलिस घटनास्थळी आले होते. त्यांनी चौकशी केल्यानंतर जवळपास 3 लाख लोकांची फसवणूक झाल्याचं त्यांच्या समोर आले. त्यांच्याकडून तब्बल 500 कोटींची रक्कम घेवून कंपनीचा मालक पसार झाला होता. आम्हाला आता व्याज नको. जे पैसे आम्ही गुंतवले आहेत ते तरी आम्हाला मिळावेत अशी मागणी होत आहे. दादर इथल्या कार्यालया बाहेर मोठ्या प्रमाणात गद झाली आहे.
- टोरेस ज्वेलर्समधून ग्राहकांना बनावट हिरे विकल्याचेही समोर आले आहे. 200 ते 300 रुपयांचे खडे हे 6 ते 7 हजारांना विकले आहेत. नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांचा आर्थिक गुप्तवार्ता विभाग दहा दिवसांपासून तेथे चालणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. त्यानंतर तपास पथकाने बनावट ग्राहक बनून खरेदी केलेला हिरा बनावट असल्याचेही पडताळणीत समोर आले. येत्या 3-2 दिवसात पोलीस येथे छापा टाकण्याच्या तयारीत होतेच परंतु त्यापुवच घोटाळा उघड झाला. टोरेस आर्थिक घोटाळ्यात भाईंदर येथील कंपनीशी निघडीत तिघा जणांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 26 लाखाची रोकड जप्त केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai