नोकरीचे आमिष दाखवून 16 लाखांची फसवणूक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 26
पनवेल : महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआय विभागातील वरिष्ठ अधिकारी पदावर असल्याचे भासवून पनवेलमध्ये एका व्यक्तीने सहा जणांना नोकरी लावतो म्हणून तब्बल 16 लाख 44 हजार 499 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नेरूळ येथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरूणाने दिलेल्या ऑनलाईन तक्रारीनंतर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये पनवेल शहरातील पनवेल प्लाझा या कॉ.ऑप. सोसायटीतील व्यक्तीने ही फसवणूक केली आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात या फसवणूकीची सुरूवात झाली. फसगत झालेला तरूण भारतीय पोस्ट विभागात कंत्राटी कामगार आहे. कायम स्वरूपी नोकरी मिळावी यासाठी त्याच्या काही ओळखीच्या व्यक्तीने पनवेलमधील या व्यक्तीचे नाव सूचविले होते. पनवेल शहरातील पनवेल प्लाझा या इमारतीमध्ये या व्यक्तीचे कार्यालयात सुरूवातीला तरूणाची भेट झाली. स्वता डीआरआय विभागात वरिष्ठ पदावर आणि त्याचे सहकारी कॅप्टन असून ते मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावतात अशी दोघांची ओळख करून या तरूणाचा विश्वास संपादन केला. सरकारी कार्यालयात किंवा महाराष्ट्र सिक्युरीटी बोर्डात कामाला लावण्यासाठी 70 हजार रुपयांची मागणी केली.
नोकरी लागणार असल्याने या तरूणाने 70 हजार बँकेच्या बचत खात्यातून वळते केले. मात्र 10 महिने नोकरी न लावत असल्याने वारंवार संपर्क केल्यावर त्यांना मुंबई येथील मंत्रालयाजवळ बोलावले. मंत्रालयाच्या सूरक्षा रक्षकाच्या केबीनमध्ये एका अधिकाऱ्यासोबत या नोकरी मिळण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या तरूणाची ओळख करून देण्यात आली या अधिकाऱ्यानेही नोकरीसाठी प्रयत्न करतो असे या तरूणांना सांगीतले. त्यामुळे अजून विश्वास बसला. मात्र अनेक महिने नोकरी लागत नसल्याने या तरूणाने दिलेल्या 70 हजार रुपयांची परत देण्याची मागणी केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संशय वाढला. अखेर आपल्या प्रमाणे इतर पाच तरूणांची फसवणूक झाल्याचे समजले. यामुळे या सहा तरूणांनी नवी मुंबई पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याकडे अर्ज केला. या अर्जाची सखोल चौकशी केल्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत नूकताच गुन्हा नोंदविण्यात आला. सातारा जिल्ह्यातील औंध येथील 30 ते 32 वर्षीय तरूणाने इतरांना नोकरी लावतो असे भासवण्यासाठी पनवेलच्या सोसायटीमध्ये भाड्याने ऑफीस घेणे आणि मंत्रालयातील सूरक्षा रक्षकाच्या केबीनमध्ये तरूणांना नोकरी मिळेल असे आश्वासन देणे इथपर्यंत विविध व्यक्ती गुंतल्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे अजून खोल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणात अजून किती तरूणांची अजून किती लाख रुपयांची फसवणूक झाली यासाठी पोलिसांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai