पार्किंगची जागा असेल तरच मिळणार नवीन गाडी
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 14, 2025
- 360
वाढत्या वाहन खरेदीला लगाम लावण्याचा विचार; जपानच्या धतवर नवे धोरण राबविणार
मुंबई : वाढती वाहतूक कोंडी, रस्ते अपघात, वाहन उभे करण्यासाठी जागेचा अभाव, इंधनाचा अमर्याद वापर यावर निर्बंध आणण्यासाठी वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा विचार परिवहन विभाग करीत आहे. जपानच्या धतवर याबाबत धोरण राबवण्यात येणार आहे. जपानमध्ये वाहन खरेदीपूव वाहन उभे करण्याची जागा खरेदी करावी लागते. त्याचधतवर राज्यात पार्किंग धोरण तयार करण्याचा विचार परिवहन विभाग करीत आहे. ज्यामध्ये नवीन गाडी घ्यायची असेल तर पार्किंग सर्टिफिकेट असणे गरजेचे राहणार आहे. परिवहन विभागाने 100 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये या धोरणाचा समावेश आहे.
राज्यात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. दरवष या संख्येत तब्बल 5 ते 8 टक्के वाढ होते. वाहनांची टक्केवारी पाहता भविष्यात कितीही प्रकल्प राबविले तरी ते लाभदायक ठरणार नाहीत. वाढत्या वाहन खरेदीला लगाम लावण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने जगभरातील विविध देशांतील परिवहन विभागाचा अभ्यास केला. यासंदर्भात जपानच्या धतवर धोरण तयार करण्याचे ठरवले आहे. या धोरणाबाबत विविध शासकीय संस्था, तज्ञांसोबत चर्चा केल्यानंतर हे धोरण मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात जर हा नियम लागू झाला तर किमान शहरात वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीला गाडी पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे याचे सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. हे सर्टिफिकेट पोलिसांमार्फत दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्र सरकार यावर विचार करत आहे. जपानमध्ये असा नियम लागू आहे. जपानमध्ये कारचे उत्पादनही जगाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे तिथे वाहनांची खरेदी-विक्रीही जोरात असते. तिथे देखील जागेची समस्या असल्याने वाहन मालकांकडून रजिस्ट्रेशन करण्यापूव कार पार्क करायला जागा आहे का, हे पाहिले जाते. यानंतर त्यांना कार रजिस्टर करता येते
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai