लालपरीचा प्रवास 14.97% महागला
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 25, 2025
- 382
काली-पिलीचीही भाडेवाढ
मुंबई : सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास आता महागला आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षात एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नव्हती. त्यामुळे तब्बल 14.97 टक्क्के प्रवासभाडे वाढवण्यात आले आहे. ही भाडेवाढ 25 जानेवारीपासून लागू केली जाणार आहे. याआधी 26 ऑक्टोबर 2021 रोजी भाडेवाढ करण्यात आली होती. तसेच 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार आहे.
एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्याने तसंच महागाई भत्त्यात वाढ झाल्याने आपोआप भाडेवाढ सुत्रानुसार उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी 1 जानेवारी 2025 रोजी परिवहन महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. यानंतर अखेर आता एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबरोबरच रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार आहे. 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
राज्याच्या प्रधान सचिवांबरोबर गुरुवारी एक महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीत एसटीच्या भाडेवाढीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ करण्यात आली नव्हती. खरं तर एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. एसटीच्या तिकीट दरात दरवष वाढ करणं गरजेचं असतं. कारण प्रवाशांना सुविधा देत असताना एसटी महामंडळाला खर्चही येतो. यामध्ये डिझेलचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत. यातच एसटी महामंडळाची परिस्थिती आपण पाहिली तर दरदिवशी सुमारे 3 कोटींचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता एसटीची 14.97 टक्के भाडेवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच एसटीची ही भाडेवाढ 25 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसेच राज्य सरकारने एसटी प्रवासात ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती बंद करण्यात येणार नाहीत. त्या सवलती सुरुच राहतील. तसेच महिलांना एसटी तिकीटातून 50 टक्क्यांची सूट देखील सुरु राहणार आहेत. तसेच 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार आहे. ही भाडेवाढ 3 रुपये प्रति किलोमीटर होणार आहे.
नवे दर कसे असणार आहेत -
- एसटीमधून प्रवास करता प्रति टप्पा 6 किमीसाठी भाडं आकारलं जातं. साध्या बसचे सध्याचे भाडे 8.70 रुपये आहे, ते आता 11 रुपये असेल. जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचंही भाडं सारखंच असेल. निम आरामसाठी 11.85 रुपयांऐवजी 15 रुपये मोजावे लागतील.
- शिवशाही (एसी) बसंच भाडं 12.35 वरुन 16 रुपये झाले आहे. तर शिवशाही स्लिपरसाठी (एसी) 17 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच शिवनेरीचे (एसी) भाडं 18.50 ऐवजी 23 रुपये झालं आहे. तसंच शिवनेरी स्लिपरचं भाडं 28 रुपये आहे.
- काळी-पिवळी मीटर टॅक्सी व ऑटोरिक्षा भाडेदर वाढ
- काळी-पिवळी मीटर टॅक्सीसाठी (सीएनजी) पूवचे प्रति कि.मी. रुपये 18.66 वरून रुपये 20.66 भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रूपये 28 वरून रुपये 31 भाडेदर असणार आहे.
- कुल कॅबसाठी पूवचे प्रति कि.मी. भाडे रुपये 26.71 वरून रुपये 37.2 (20 टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता कुल कॅबसाठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रुपये 40 वरून रुपये 48 रुपये भाडेदर असणार आहे.
- ऑटोरिक्षासाठी (सीएनजी) पूवचे प्रति कि.मी. भाडे रुपये 15.33 वरून रुपये 17.14 रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रूपये 23 वरून रूपये 26 रुपये भाडेदर असणार आहे.
- सदर भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील सर्व काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांना लागू राहील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai