नानवली ठरले स्वप्नातील गाव
- by मोना माळी-सणस
- Feb 10, 2025
- 1515
तळाः तालुक्यातील गिरणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नानवली गावाला स्वदेस फाऊंडेशनकडून स्वप्नातील गाव हे मानांकन घोषित झाले आहे. ग्रामीण भारताला सक्षम बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून काम करणाऱ्या स्वदेश फाऊंडेशनच्या ड्रीम व्हिलेज अर्थात स्वप्नातील गाव याउपक्रमाअंतर्गत असलेली स्वच्छ, सुंदर स्वास्थ, साक्षर, सक्षम, स्वावलंबन या पाच बाबींवर काम केल्याने नानवली गावाला हा बहुमान मिळाला आहे. यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करणाऱ्या स्वदेस फाऊंडेशनचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात नानवली गावात नुकताच संपन्न झाला.
ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्वदेश फाऊंडेशनमार्फत तेथे स्वप्नातील गाव या संकल्पनेअंतर्गत विकास कामे केली जातात. पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार, आर्थिक विकास असे एक-दोन नाही तर तब्बल 41 प्रकारचे पॅरामीटर समाविष्ट करुन त्यावर सातत्यपुर्ण काम करुन ते गाव ड्रीम व्हिलेज म्हणून घोषित केले जाते. नानवली गावाचा स्वप्नातील गाव करण्याच्या उद्देशाने प्रवास सन 2019 मध्ये सुरु झाला. ड्रीम व्हिलेज उपक्रमाचा सुरळीत प्रवाह ग्राम विकास समितीद्वारे समुदाय नेतृत्व निर्माण करून आणि त्यांचे पालनपोषण करून साध्य केला जातो. गाव विकास समितीच्यावतीने, सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध विकासकामे, मानांकने व मापदंड पुर्ण केल्याने आज नानवली हे स्वप्नातील गाव म्हणून घोषित झाले आहे. या स्वप्नपुतचा आनंद साजरा साजरा करण्यासाठी तसेच यामागे ज्यांचे अथक मेहनत, परिश्रम आहेत अशा स्वदेस फाऊंडेशनच्या प्रतिनिधींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी गावाच्या प्रवेश कमानीचे उद्घाटन तळा उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. कार्यक्रमाला स्वदेशचे प्रतिनिधी, सरपंच लिला जाधव, उपसरपंच नागेश लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब भौड, रा. काँ. महिला अध्यक्ष जान्हवी शिंदे , ग्रामपंचायत सदस्य, नानवली पुरुष व महिला मंडळ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होत्या. नानवली महिला मंडळाने यावेळी लेझिमच्या तालावर ठेका धरत पाहुण्यांचे स्वागत केले. मान्यवरांना श्री दत्तगुरुंची प्रतिमा, शाल आणि तुळसीचे रोप भेट देवून सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी मार्गदर्शनपर भाषणात स्वप्नातील गावातील नागरिकांचे कौतुक व अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुमधुर असे स्वागतगीत सादर करुन विद्याथनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मोना विलास सणस यांनी प्रभावी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर माध्यमिक शिक्षक मनोज भाऊ सुतार यांनी बहारदार असे सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सगळ्या सोहळ्यामध्ये ग्रामस्थांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
- स्वदेस फाऊंडेशनच्या सहकार्यामुळे गावाचा विकास झाला, नागरिक स्वावलंबी झाले, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण अशा एक ना अनेक सेवासुविधांचा लाभ ग्रामस्थांना मिळत असल्याचे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले. विकास कामात सातत्य आणि गुणवत्ता कायम ठेवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
- गावात झालेली विकासकामे
खुंटी कलम लावणे, फळबाग लागवड, शोषखड्डे निर्मिती, शौचालये, कुक्कुटपालन, सौरऊर्जा पॅनेल, आयुष्यमान कार्ड उपलब्ध करुन देणे, मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया, सुका व ओला कचऱ्याचे वगकरण, दर महिन्याला गावात स्वच्छता मोहिम राबवणे.
- 700 गावांचा सहभाग
रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर आणि सुधागड तालुक्यांमध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे काम गाव विकास समितीच्या सहकार्यातून सुरु आहे. या उपक्रमाला सरकारचे सहकार्य लाभले आहे. रायगड जिल्ह्यातील 700 गावांमध्ये स्वच्छ, सुंदर, स्वस्थ, सक्षम, आत्मनिर्भर या विषयावर आधारित कामे सुरू असून आतापर्यंत 100 गावांना स्वप्नातील गाव पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस