Breaking News
मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
याबाबत दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या 100 वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत. इंदू मिल येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूत तयार करण्याचे कामही राम सुतार करीत आहेत. या पुरस्कार निवडीबाबत 12 मार्च 2025 रोजी निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राम सुतार यांचे नाव 2024 च्या पुरस्कारासाठी मान्यता देण्यात आली. या पुरस्कारचे स्वरूप 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai