 
                                    		
                            राज्यात दहावीचा निकाल 94.10 %
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2025
- 144
मुंबई : राज्यात 12 वीनंतर आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यंदा दहावीचा निकाल 94.10 % लागला असून कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के असून नागपूर विभागात सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे. राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले असून लातूरमधील 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवत देदीप्यमान कामगिरी बजावल्याचं दिसून येते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहारीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्क्केवारी 96.16 तर मुलांच्या 92.61 टक्के आहे. राज्यात 275 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहेत तर शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 211 असण्याची माहिती आहे. त्यापैकी 113 विद्याथ लातूर विभागाचे आहेत. राज्यात 4 लाख 88 हजार 745 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. निकालाची विभागनिहाय टक्केवारी
पुणे : 94.81 टक्के
नागपूर : 90.78 टक्के
संभाजीनगर : 92.82 टक्के
मुंबई : 95.84 टक्के
कोल्हापूर : 96.78 टक्के
अमरावती : 92.95 टक्के
नाशिक : 93.04 टक्के
लातूर : 92.77 टक्के
कोकण : 98.82 टक्के
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
                                    
                            Stock Market by TradingView
                                
                             
                                 
                                     
                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
                                             
                                                     
                                                     
                                                     
                                                    
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai