Breaking News
पुणे : ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत लाभाथ मेळावा व महा आवास अभियान 2022-23 राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. 03 जून, 2025 रोजी मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रिडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचे उद्दीष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यात येईल, या माध्यमातून ग्रामीण भागात 80 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ग्रामविकास व पंचायत राज व राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण- गृहनिर्माण विभागाच्यावतीने श्री छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभाथ मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. विक्रमी संख्येने महाराष्ट्रासाठी घरकुलांचे उद्दीष्ट मंजूर केल्याने केंद्रीय मंत्री चौहान यांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 2011 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात बेघर असलेल्यांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. राज्याचे उद्दीष्ट अत्यंत कमी होते. 2017 मध्ये हे उद्दीष्ट पुरेसे नसल्याने अधिक उद्दीष्ट मंजूर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर आलेल्या आवास प्लस योजनेत नोंदणीची सुविधा केंद्राने दिल्याने 30 लाख बेघराची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्याची घरे पूर्ण करीत असतांना केंद्राने 20 लाख घरकुलांना मंजूरी दिली. त्यापैकी 10 लाख घरांचा पहिला हप्ता ग्रामविकास विभागाने जमा केले आहे. आता नव्याने 10 लाख घरकुलांचे पत्र मिळाल्याने जुन्या यादीपैकी एकही लाभाथ घरकुलाशिवाय राहणार नाही. शिवाय अजून कुणी सुटले असल्यास नव्याने सर्वेक्षण करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, सर्वांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करीत असतांना गेल्या 7 वर्षात राज्याला प्रधानमंत्री आवास योजनेचे 13 लाख 57 हजार उद्दीष्ट मिळाले होते. यावष 20 लाख घरांचे विक्रमी उद्दीष्ट मिळाल्याने या योजनेच्या अंमलबजावणीला गती येईल. या घरांना मंजूरी देण्याचे काम 45 दिवसात करण्यात आले आणि मंजूरी पत्र एकाच दिवशी देण्यात आले. घर बांधत असतांना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घरकूलासाठी 50 हजाराचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला.
यावेळी ‘अमृत ग्राम महा आवास अभियान-महाराष्ट्राची गौरवगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत पुरस्कार विजेत्यांची यशोगाथा देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्रतिनिधीक स्वरूपात महा आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या चावीचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 10 लाख घरांचे उद्दीष्ट पत्र सुपूर्द करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींची यादी
सर्वात्कृष्ट विभाग
विभागीय आयुक्त, अपर आयुक्त (विकास), सहाय्यक आयुक्त (विकास) या कार्यालयांना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये कोकण विभागाचा प्रथम क्रमांक, नाशिक विभागाला द्वितीय क्रमांक,नागपूर विभागाला तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे .तसेच राज्य पुरस्कार आवास योजने मध्ये नाशिक विभाग प्रथम क्रमांक, कोकण विभाग द्वितीय क्रमांक ,पुणे विभागाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
सर्वात्कृष्ट जिल्हे
जि.प.अध्यक्ष/प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण जिल्हा अहिल्यानगर यांना प्रथम व सिंधुदुर्ग द्वितीय क्रमांक, गोंदीया जिल्हयाला तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेमध्ये अहिल्यानगर यांना प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय क्रमांक, सातारा जिल्हाला तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.
सर्वात्कृष्ट तालुके
पं.स. सभापती/प्रशासक, गट विकास अधिकारी कार्यालयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये तालुका पाथड, अहिल्यानगर यांना प्रथम क्रमांक, देवगड, सिंधुदुर्ग द्वितीय क्रमांक, जावळी, सातारा तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेमध्ये तालुका जामखेड, अहिल्यानगर प्रथम क्रमांक, आरमोरी, गडचिरोली व्दितीय क्रमांक,अंजनगाव सुज, अमरावती तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.
सर्वात्कृष्ट ग्रामपंचायती
ग्रा.पं. सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी कार्यालय प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये ग्रामपंचायती येळगाव, कराड, सातारा यांना प्रथम क्रमांक, भूडकेवाडी, पाटण, सातारा व्दितीय क्रमांक, चोंढी, मानोरा, वाशिम तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेमध्ये ग्रामपंचायत बॉन्द्री, पाटण, सातारा यांना प्रथम क्रमांक, कारखेडा, मानोरा, वाशिम व्दितीय क्रमांक, कुळवंडी, खेड, रत्नागिरी तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.
सर्वात्कृष्ट बहुमजली इमारती
पं.स. सभापती/प्रशासक, गट विकास अधिकारी मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण हनुमंत खेडे, धरणगाव, जळगाव प्रथम क्रमांक, भोसा (टाकळी), मोहाडी, भंडारा द्वितीय क्रमांक, मोहगव्हाण, मानोरा, वाशिम तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेमध्ये अंतांपूर, बागलाण, नाशिक प्रथम क्रमांक, डोंगरजवळा, गंगाखेड, परभणी व्दितीय क्रमांक शिंद, भोर, पुणे तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.
सर्वात्कृष्ट गृहसंकुले
पं.स. सभापती/प्रशासक, गट विकास अधिकारी गट प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये वांगदरी, श्रीगोंदा, अहिल्यानगर प्रथम क्रमाक, गनोरी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर द्वितीय क्रमांक, लक्ष्मी दहिवडी, मंगळवेढा, सोलापूर तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेमध्ये नांदगाव, अहिल्यानगर, अहिल्यानगर प्रथम क्रमांक, कुशेर बु. आंबेगाव, पुणे व्दितीय क्रमांक, डोंगरगाव, राजुरा, चंद्रपूर तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai