 
                                    		
                            भरारी आधीच स्वप्नांची राख
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 14, 2025
- 94
अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या बोईंग 171 फ्लाईटमधील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुदैवाने 1 प्रवासी बचावला आहे. शिवाय विमान ज्या रहिवाशी भागात कोसळले तेथील 24 जैंना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण गंभीरजखमी झाले आहेत. अत्यंत वेदनादायी घटनेनं देश शोकसागरात बुडाला असून मृतांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.
गुरुवारी दुपारी गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला अन् अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. 242 प्रवाशांसह अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटांत जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली. मात्रअपघात एरढा भिषण होता की एअर इंडियाच्या 171 विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या अपघातातून आश्चर्यकारकरित्या एक जण बचावला आहे.
या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते. या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी प्रवास करत होते. क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या. दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते. जवळील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. तर, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
- हॉस्पिटलमधील 15 डॉक्टर जखमी
 विशेष म्हणजे विमानाचा अपघात इतका भयंकर होता की, अहमदाबादच्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळलं असून तेथील हॉस्टेलवर जेवण करणाऱ्या भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरुन उठवण्याचं काम ह्या दुर्घटनेनं केलं. येथील 24 जण मृत्यू पावले असून 15 डॉक्टर जखमी झाले ओत.
- टाटाची प्रत्येकी 1 कोटींची मदत 
 एअर इंडिया ही कंपनी टाटा ग्रुपने घेतल्याने या विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपकडूनही दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे. तर, विमान अपघातात कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासनही टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आले आहे.
- विमाने ग्राउंड होऊ शकतात
 केंद्र सरकार बोईंग ड्रीमलायनर 787-8 विमानांना उड्डाण करण्यापासून रोखण्याचा विचार करत आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की सुरक्षा पुनरावलोकनासाठी विमाने ग्राउंड केली जाऊ शकतात. अहमदाबादमधील विमान अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
- 4 चार क्रू मेबर्सं महाराष्ट्रातील 
 महाराष्ट्रातील 4 चार क्रू मेबर्सं होते, विशेष म्हणजे कॅप्टन सुमित पुष्कराज सभ्रवाल यांच्यासह आणखी 3 क्रू मेंबर्स हे महाराष्ट्रातील रहिवाशी होते. त्यामध्ये, सुमित पुष्काराज आणि अर्पण महाडिक हे दोघे मुंबईतील रहिवाशी आहेत. तर, दीपक पाठक हे बदलापूरचे आणि रोशनी सोनघरे ह्या डोंबिवलीकर आहेत. या दुर्घटनेत 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्संचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुबीयांवर व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
- उरणच्या हवाईसुंदरीचा समावेश 
 विमान दुर्घटनेत पनवेल तालुक्यातील न्हावे गावची कन्या मैथिली मोरेश्वर पाटील हिचा समावेश आहे. मैथिली हीगेल्या दोन वर्षापासून हवाईसुंदरी म्हणून कार्यरत होती. मैथिली अवघ्या 23 वर्षांची होती आणि एअर इंडियामध्ये फ्लाईट ॲटेंडंट होती. गुरुवारी सकाळी ती लंडनच्या फ्लाईटसाठी न्हावा गावातून मुंबई विमानतळ आणि तेथून अहमदाबाद विमानतळावर पोहोचली होती. तिथं पोहचल्यावर ती सकाळी साडेअकराच्या सुमारास कुटुंबीयांशी बोलली होती. शिवाय लंडनला पोहोचल्यावर फोन करेल, असे तिने आईवडिलांना सांगितले होते. दुर्दैवाने गुरुवारी सकाळी झालेले बोलणे हाच त्यांच्यातील शेवटचा संवाद ठरला.
- एटीएस करणार चौकशी
 अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात प्रकरणाची चौकशी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) करणार आहे. या प्रकरणात, अपघातस्थळावरून एक डीव्हीआर सापडला आहे, जो एटीएसने ताब्यात घेतला आहे. गुजरात एटीएस टीम या प्रकरणात समांतर तपास करत आहे. त्याच वेळी, फॉरेन्सिक टीमने अपघातस्थळावरून नमुने गोळा केले आहेत, जे तपासणीसाठी पाठवले जातील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
                                    
                            Stock Market by TradingView
                                
                             
                                 
                                     
                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
                                             
                                                     
                                                     
                                                     
                                                    
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai