जीसटीच्या दरात बदल
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 06, 2025
- 91
चार वरुन दोन स्लॅब ; घर खरेदी स्वस्त होणार
मुंबई ः केंद्र सरकारने सणासुदीपूर्वी सामान्य माणसाला मोठा दिलासा देत, नवीन जीएसटी सुधारणांमुळे अनेक गोष्टींचे कर दर कमी झाले आहेत. कराचे सध्याचे चार स्लॅब कमी करून फक्त दोन करण्यात आले आहेत. आता 12% आणि 28% वाले स्लॅब बंद करण्यात आले असून फक्त 5% आणि 18% कर राहील. सरकारने याला “नेक्स्ट-जनरेशन जीएसटी रिफॉर्म” असे नाव दिले आहे, हे बदल येत्या 22 सप्टेंबर पासून देशभरात लागू केले जाईल. या जीएसटी सुधारणांचा फायदा प्रत्येक वर्गाला होईल, कारण दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते टीव्ही-एसी फ्रिजच्या किमती कमी होतील. दररोज लोक दूध, ब्रेड, भाज्या इत्यादी खरेदी करतात. नवीन जीएसटी सुधारणांअंतर्गत, त्यांच्या किमतीही कमी होतील.
उपचार आणि विमाही परवडणाऱ्या दरात होणार उपलब्ध
आरोग्य आणि जीवन विम्यावरील 18% जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. यामुळे प्रीमियम भरणाऱ्यांना थेट दिलासा मिळेल. तसेच मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन, डायग्नोस्टिक किट, ग्लुकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स, करेक्टिव्ह चष्मे आणि थर्मामीटरवर आता फक्त 5% जीएसटी आकारला जाणार आहे.
शिक्षणाशी संबंधित वस्तू करमुक्त
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित अनेक वस्तू आता पूर्णपणे करमुक्त झाल्या आहेत. नकाशे, चार्ट, ग्लोब, व्यायाम पुस्तके, नोटबुक, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन, पेस्टल आणि खोडरबर यावर पूर्वी 5% किंवा 12% कर लागत होता, मात्र आता तो शून्य करण्यात आला आहे. यामुळे शालेय शिक्षणाशी संबंधित खर्चात लक्षणीय घट होईल आणि पालकांना मोठा दिलासा मिळेल.
शेतकऱ्यांनाही मोठा फायदा
ट्रॅक्टरचे टायर आणि सुट्या भागांवरील जीएसटी 18% वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच बयो-पेस्टीसाईड्स जैव-कीटकनाशके, माइक्रोन्यूट्रिएंट्स, ड्रिप इरिगेशन सिस्टम (ठिबक सिंचन प्रणाली) आणि आधुनिक कृषी यंत्रसामग्री देखील आता 5% कर स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. यामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल.
गाड्या विकत घेणंही होणार स्वस्त
ऑटोमोबाईल क्षेत्राला दिलासा देण्यासाठी देखील कर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता काही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वाहने, जी पूर्वी 28% कर स्लॅबमध्ये होती, ती 18% स्लॅबमध्ये आणण्यात आली आहेत. तीनचाकी वाहनं,350 पर्यंतच्या मोटारसायकल, आणि वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरही आता 18% जीएसटी आकारला जाईल. यामुळे ऑटो क्षेत्राला चालना मिळेल आणि ग्राहकांसाठी वाहने स्वस्त होतील.
इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणंही होणार स्वस्त
एअर कंडीशनर अर्थात ए.सी. 32 इंचापेक्षा मोठे एलईडी/एलसीडी टीव्ही, मॉनिटर्स, प्रोजेक्टर आणि डिशवॉशरवरील जीएसटी आता 28% वरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती कमी होतील आणि घरगुती बजेटवरील भार कमी होईल.
दूध, चीज आणि डेअरी आयटम्सवर किती?
दूध आणि भाज्यांवर पूर्वी जीएसटी दर लागू नव्हता आणि आताही लागू केलेला नाही. म्हणजेच त्याच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही. पनीरवरील जीएसटी दर 12% वरून 0% पर्यंत कमी करण्यात आला आहे. अंड्यावरही जीएसटी दर नाही. लोणी आणि तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी 12% ते 5% च्या स्लॅबमध्ये ठेवण्यात आला आहे.
बेकरी प्रोडक्ट किती स्वस्त?
पिझ्झा आणि ब्रेडवरील जीएसटी 5% वरून शून्य श्रेणीत आणण्यात आला आहे. चॉकलेट, बिस्किटं आणि मिठाईंवरील जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे. 50 रुपयांचं चॉकलेट आता 44 रुपयांना खरेदी करता येईल. फळांचा रस आणि नारळाच्या पाण्यावरील कर 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आलाय.
इतर दैनंदिन वापराच्या वस्तू
केसांचं तेल, शाम्पू, टूथपेस्ट, शेव्हिंग उत्पादने, टॅल्कम पावडर 18% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आली आहे. टॉयलेट सोपवरील (बार/केक) जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे.टूथब्रश, डेंटल फ्लॉसवरील जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे. शेव्हिंग क्रीम/लोशन, आफ्टरशेव्हवरील जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
घरखरेदीदारांना दिलासा
नवीन जीएसटी कर रचनेचा मोठा फायदा बांधकाम क्षेत्राला, विकासकांना आणि घर खरेदीदारांना होणार आहे. बांधकाम साहित्यातील सर्वात महत्त्वाच्या अशा सिमेंटवर 28 टक्के जीएसटी आकारला जात होता. त्यामुळे सिमेंटचे दर गगनाला भिडले आहेत. आता मात्र सिमेंटच्या दरात घट होणार आहे. सिमेंटवरील 28 टक्के जीएसटी कर कमी करून तो 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्याचवेळी मार्बल, ग्रॅनाईटवर 12 टक्के जीएसटी कर लागत होता पण आता तो 5 टक्के करण्यात आला आहे. वाळू, वीटांवरील कर 12 टकक्यांवरुन 5 टक्के, फरशी, भिंतीवरील आवरणे, लाकूड यांच्यावरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर तर अक्षय ऊर्जा उपकरणांवरील कर 12 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्यात आला आहे. सिमेंट,वाळू,वीटा, फरशी आणि अन्य बांधकाम साहित्यावरील जीएसटी कर कमी करण्यात आल्याने या बांधकाम साहित्यांच्या दरात कपात होणार असल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai