‘श्रीगणेशा आरोग्याचा’ 7.4 लाख नागरिकांना लाभ
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2025
- 84
16,798 जणांनी केले रक्तदान
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान 12,655 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून 7 लाख 4073 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या 18,800 रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेच, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून 236 शिबिरांतून एकूण 16,798 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.
28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानात :
- एकूण आरोग्य शिबिरे : 12,655 एकूण लाभार्थी रुग्ण : 7,04,073 एकूण पुरुष लाभार्थी : 3,13,508 एकूण महिला लाभार्थी : 3,05,034 लहान बालक लाभार्थी : 85,508 संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : 18,800 एकूण रक्तदान शिबिरे : 236 एकूण रक्तदाते : 16,798 महाराष्ट्रातील 7.04 लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर 16,798 दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी योगदान दिले आहे. जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान सर्वाधिक शिबिरे : पुणे 2525 सर्वाधिक रुग्ण तपासणी : पुणे 1,65,718 सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे 3,613 सर्वाधिक रक्तसंकलन : कोल्हापूर 4,504
- एकूण आरोग्य शिबिरे : 12,655
- एकूण लाभार्थी रुग्ण : 7,04,073
- एकूण पुरुष लाभार्थी : 3,13,508
- एकूण महिला लाभार्थी : 3,05,034
- लहान बालक लाभार्थी : 85,508
- संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : 18,800
- एकूण रक्तदान शिबिरे : 236
- एकूण रक्तदाते : 16,798
- महाराष्ट्रातील 7.04 लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर 16,798 दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी योगदान दिले आहे.
- जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान
- सर्वाधिक शिबिरे : पुणे 2525
- सर्वाधिक रुग्ण तपासणी : पुणे 1,65,718
- सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे 3,613
- सर्वाधिक रक्तसंकलन : कोल्हापूर 4,504
बालकांचा सर्वाधिक सहभाग : पुणे 20,781
गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून 7.4 लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करता आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या 18,800 रुग्णांना पुढील मोफत उपचार दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai