Breaking News
मुंबईः : राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. 23) झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य आरोग्य विमा योजनेतील राखीव निधी आता पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या नऊ गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वापरला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
राज्य आरोग्य विमा योजनेतील राखीव निधी पाच लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या अशा नऊ गंभीर आजारांच्या उपचारासाठी वापरण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. 23) मान्यता दिली. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, विस्तारित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत दाव्यांचा निपटारा 20 टक्के आता राज्य आरोग्य विमा सोसायटीच्या राखीव निधीत हस्तांतरित केला जाईल.
सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, महागड्या प्रक्रियांमध्ये यकृत, फुफ्फुस, हृदय व अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा समावेश असेल. यकृत प्रत्यारोपणासाठी 22लाख रुपये, फुफ्फुस किंवा एकत्रित हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी 20 लाख रुपये, हृदय प्रत्यारोपणासाठी 15 लाख रुपये, तर अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी 9.5 ते 17 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, हृदयाच्या झडपांवरील ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन आणि ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट या प्रक्रियांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांपर्यंत खर्चाचा समावेश असेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai