मतदानाचा दिवस ठरला
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 04, 2025
- 53
2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरलाला मतमोजणी
मुंबई : मतदार याद्यांमधील घोळ पूर्णपणे मिटवला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेतलेली आहे. मात्र विरोधकांच्या आक्षेपानंतरही राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुका होणारआहेत. 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असून 10 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीची विहित मुदत संपुष्टात आली होती. आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी अखेरीस पूर्ण करण्याचे बंधन असल्याने निवडणूक आयोगाने त्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली.
निवडणूक कार्यक्रम कसा असणार?
-अर्ज दाखल करण्याची तारीख -10 नोव्हेंबर 2025
-अर्ज दाखल अंतिम मुदत- 17 नोव्हेंबर 2025
-छाननीची तारीख-18नोव्हेंबर 2025
-माघार घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025
-अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- 25 नोव्हेंबर 2025
-निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- 26 नोव्हेंबर 2025
-मतदानाचा दिवस -2 डिसेंबर 2025
-मतमोजणीचा दिवस-3 डिसेंबर 2 025
- निकाल- 10 डिसेंबरला
निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसतील
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर होणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai