महापारेषणला तीन राष्ट्रीय पारितोषिके जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 38
सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, सर्वोत्कृष्ट फिल्मचा (इंग्रजी) पुरस्कार; भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान विशेष पुरस्कार
मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके नुकतीच जाहीर झाली. यामध्ये सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी जनसंपर्क विभागाचे कौतुक केले आहे.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी देशातील सर्वोत्तम संस्था आहे. डेहराडून (उत्तराखंड) येथील हॉटेल एमराल्डमध्ये 13 ते 15 डिसेंबरला होणाऱ्या 47 व्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवाच्या उदघाटन समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महापारेषणच्या जनसंपर्क विभागाची विविध पुरस्कारासाठी निवड करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत व बहिर्गत संपर्कासाठी राबविलेले उपक्रम, महापारेषण समाचार या गृहमासिकात केलेले डिजिटल बदल, क्यू-आर कोड तसेच इतर डिजिटल माध्यमांव्दारे सकारात्मक पध्दतीने वापर केला आहे. नागरिकांनी उच्च दाब वीजवाहिनीची काळजी कशी घ्यावी, सेवा पंधरवड्यात राबविलेले विविध सामाजिक उपक्रम, महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी, ड्रोनच्या सहाय्याने दुर्गम भागात अखंड वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी ही फिल्ममध्ये अनिमेशनचा वापर करून दाखविली आहे. या फिल्मची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. तसेच महापारेषणचे व्हॉटसअप बुलेटिन, ऑडिओ-व्हिज्युअल्स बुलेटिन, व्हॉटसअप चॅनेल, समाजमाध्यमांचा सकारात्मक पध्दतीने जनसंपर्कासाठी वापर, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम समाजमाध्यमांतून जनतेसमोर मांडले. ऊर्जा विभागाने केलेली सकारात्मक कामगिरी, पत्रकारिता व जनसंपर्क विभागाच्या विद्यार्थ्यांशी वार्तालाप, विविध प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात महापारेषणची भूमिका विशद करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai