तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 30
राष्ट्रीय हरित लवादाचा अंतरिम आदेश
नाशिक : नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून 15 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती अंतरिम आहे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोडी थांबविण्याचा आदेश देण्यात आला आहे. वकील श्रीराम पिंगळे यांनी सांगितले की, हरित लवादामधे नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. हरित लवादाने तपोवनातील वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली. हा अंतिम आदेश नाही तर अंतरिम आदेश आहे. तपोवनातील झाडे तोडण्याआधी न्यायिक प्रक्रिया राबवायला हवी, असं आमचं मत आहे. ती न राबवताच वृक्षतोड केली जात आहे. एकदा तोडलेल्या वृक्षांचं पुनर्रोपण नीट केलं जातं नाही, हा अनुभव आहे. यावर्षी झालेल्या कुंभमेळ्यात उभारण्यात आलेल्या एक्झिबिशन सेंटरचा काहीही उपयोग झाला नाही. वृक्षतोडीला आमचा विरोध आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन परिसरात साधू-महंतांच्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याची योजना आहे. या कामासाठी सुमारे 1800 झाडांची तोड प्रस्तावित होती, ज्यामुळे स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींनी तीव्र विरोध नोंदवला आहे. अभिनेते सयाजी शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही वृक्षतोडीविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे आणि ठाकरे गटाकडून तपोवन वृक्षतोडीविरोधात स्थानिक आंदोलन छेडण्यात आले होते. तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही, असा कडक इशारा या आंदोलनातून देण्यात आला.
दरम्यान, तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य 1800 वृक्षतोडीबद्दल शहरात तीव्र विरोध सुरू असताना, राज्य सरकारने शहरात वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मोहिमेअंतर्गत राजमुद्री येथून आणलेली झाडे आता टप्याटप्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली असून पहिला ट्रक नाशिकमध्ये दाखल झाला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच दक्षिण भारतातील राजमुद्री येथे भेट देत झाडांची निवड केली. सुमारे 15 फूट उंचीची 15 हजार देशी झाडे वड, पिंपळ, निंब, जांभूळ, आंबा आदींचा समावेश आहे. ठिबक सिंचन प्रणालीसह जैविक खतांचा वापर करून मनपा उद्यान विभागाकडून झाडांच्या देखभालीची व्यवस्था केली जाणार आहे. सोमवारपासून गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वृक्षलागवड मोहिमेला औपचारिक सुरुवात होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai