महायुतीची बाजी तर मविआचा धुव्वा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2025
- 32
मुंबई ः राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निकाल काल (21 डिसेंबर) जाहीर झाला. 288 नगरपंचायती आणि नगरपरिषदांपैकी तब्बल 213 पेक्षा जास्त जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. विशेषतः भाजपने या निवडणुकीत दमदार कामगिरी करत अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. एकट्या भाजपने 129 नगरपरिषद आणि नगरपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. भाजप - 129, शिवसेना एकनाथ शिंदे - 51, राष्ट्रवादी अजित पवार - 35, काँग्रेस - 34, राष्ट्रवादी शरद पवार - 7, शिवसेना उद्धव ठाकरे - 8, अपक्ष - 24 असे पक्षीय बलाबल पाहायला मिळाले. या निकालांमधून महायुतीचा स्थानिक पातळीवरील प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
2 डिसेंबर रोजी या 288 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा कािल काल 21 डिसेंबर रोजी लागला. यामध्ये 129 नगराध्यक्षपदे मिळवत भाजपच राज्यातील सर्व मोठा पक्ष ठरला. भाजपसोबत असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनाही चांगल्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेले दिसत नाही. काँग्रेस 34 जागांवर आघाडीवर असली तरी पक्षाच्या अपेक्षांच्या तुलनेत ही कामगिरी मर्यादित मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) केवळ 7 जागांवर तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) फक्त 8 जागांवर विजयी झाला आहे. या आकड्यांमुळे महाविकास आघाडीतील पक्षांची स्थानिक पातळीवरील संघटनेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी तब्बल 24 ठिकाणी बाजी मारली असून, स्थानिक मुद्दे आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण अजूनही प्रभावी असल्याचं यावरून स्पष्ट होतं. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरते मर्यादित नसून, येत्या काळातील महापालिका निवडणुकीच्या राजकारणाची दिशा दाखवणारे आहेत. महायुतीने स्थानिक पातळीवर मिळवलेलं हे यश आगामी निवडणुकांसाठी आत्मविश्वास वाढवणारे ठरू शकतं.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai