अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 29, 2026
- 41
राज्यात शुकशुकाट, अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद
मुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी होतं. दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज अनेक शहरांमध्ये बाजारपेठा बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये आज बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी 8:44 वाजता हा अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने जात होते. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai