प्रा. वृषाली मगदूम यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 30
नवी मुंबई : यशवंतराव दाते स्मृती संस्थेतर्फे आयोजित ज्येष्ठ विचारवंत डॉ.भा.ल.भोळे व डॉ यशवंत सुमंत स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार नुकताच वर्धा येथील बजाज सभागृहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ अभय बंग यांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हा पुरस्कार प्रा. वृषाली मगदूम यांना प्रदान करण्यात आला.
या समारंभात महाराष्ट्रातील चार सन्मानार्थींना पुरस्कार देण्यात आले. यात दीपक गायकवाड, पुणे (वैचारिक लेखन) डॉ देवकुमार अहिरे पुणे (संशोधन (युवा)), आणि डॉ नागोराव, लातूर (जीवन गौरव) यांना प्रदान करण्यात आले. डॉ अभय बंग यांनी विनोबा भावे यांच्या साहित्यातील चिरंतनत्व लक्षात घेता महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबा आणि विनोबा अशी थोर साहित्य संस्कृती परंपरा लाभली आहे असे आपल्या भाषणात प्रतिपादन केले. वृषाली मगदूम यांनी आपल्या मनोगतात लोकशाही आणि संविधान धोक्यात असताना समाजातील शेवटच्या घटकातील कचरा वेचणाऱ्या महिलांचे दारिद्य्र संपलं नाही पण त्या वैचारिकदृष्ट्या अधिक सजग आणि कणखर झाल्या आहेत असं निरीक्षण नोंदवले. याप्रसंगी राज्य ग्रंथालय संघ मुंबईचे अध्यक्ष गजानन कोटेवार यांनाही सन्मानित करण्यात आले.
डॉ अभय बंग यांनी विनोबा भावे यांच्या साहित्यातील चिरंतनत्व लक्षात घेता महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबा आणि विनोबा अशी थोर साहित्य संस्कृती परंपरा लाभली आहे असे आपल्या भाषणात प्रतिपादन केले. वृषाली मगदूम यांनी आपल्या मनोगतात लोकशाही आणि संविधान धोक्यात असताना समाजातील शेवटच्या घटकातील कचरा वेचणाऱ्या महिलांचं दारिद्य्र संपलं नाही पण त्या वैचारिकदृष्ट्या अधिक सजग आणि कणखर झाल्या आहेत असं निरीक्षण नोंदवलं.याप्रसंगी राज्य ग्रंथालय संघ मुंबईचे अध्यक्ष मा श्री गजानन कोटेवार यानाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास वर्धा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai