पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 20, 2020
- 702
मुंबई : करोनाचे महाभयंकर संकट रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या निर्णयाचा धडाका लावला आहे. महामुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर ही मोठी शहरे बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता राज्यातील पहिली ते आठवी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 31 मार्चपर्यंत राज्यात महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय परिक्षासंदर्भात घोषणा केली. शालेय परीक्षांसदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 1 ते 8वी पर्यंत सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर 10वीच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार होणार असून नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार असल्याचं शिक्षणमत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात आले आहे. हे सर्व निर्णय राज्य बोर्डाच्या बाबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दहावीचे शिक्षक सोडून इतर सर्व शिक्षकांनी घरूनच काम करावे, अशा सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai