महापौर चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा

नवी मुंबई ः महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रीडा व सांस्कृतिक वारसा जोपासणे करीता प्रतिवर्षी विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम/उपक्रम/स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणुन आचार्य अत्रे यांचे जयंती निमित्ताने अखिल भारतीय नाट्य परिषद, ऐरोली शाखा यांच्या सहयोगाने नवी मुंबई शहरात प्रथमच नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. नवी मुंबई शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी व नवोदित कलाकारांना त्यांचे कलागुण सादर करणेकरीता व्यासपीठ मिळावे हा या स्पर्धेमागचा प्रमुख हेतू असून या स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबईतील कलाप्रेमींना राज्याच्या विविध भागातील कालाकारांचा कलाअविष्कार पाहण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार 19 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 9 वा पासून नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 28, सेक्टर 15/16, मॉडर्न कॉलेजच्या बाजूला, वाशी या ठिकाणी सकाळी 8 पासून सुरु होणार असून याकरीता प्रथम नोंदणी करणे आवश्यक राहील. स्पर्धेची अंतिम फेरी 20 ऑगस्ट 2018 रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह येथे होणार आहे. या स्पर्धेत प्राथमिक फेरीत किशोरगट वय वर्षे 10 ते 16 तसेच खुलागट वय वर्षे 17 पासून पुढे याप्रमाणे वयोगट असणार आहे. स्पर्धा प्रवेश अर्ज व सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच अज्ञहळश्र इहरीींळूर चरीरींहळ छरींूर झरीळीहरव अळीेश्रळ ह्या षशलशलेेज्ञ रिसश वर उपलब्ध आहे. दोन्ही गटात यशस्वी प्रत्येकी 5 स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.