नवी मुंबईत कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 13, 2026
- 30
खाजगी-सार्वजनिक सहभागातून साकारणार प्रकल्प
नवी मुंबई : राज्याला घनकचरा समस्येने ग्रासले असताना आ. मंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून राज्यात कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. 1768 कोटी रुपये या प्रकल्पाला खर्च येणार असून हा प्रकल्प खाजगी-सार्वजनिक सहभागातून साकारला जाणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, नवी मुंबईकरांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून अशाच प्रकारचे पर्यावरणपुरक प्रकल्प नवी मुंबई महापालिकेने हाती घ्यावेत अशी मागणी नवी मुंबईकरांनी यावेळी केली आहे.
नवी मुंबई महापालिकेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन ते काम मे. आर ॲण्ड बी ग्रीनटेक एलएलपी या कंपनीला दिले आहे. या प्रकल्पासाठी सूमारे 17678 कोटी रुपये खर्च येणार असून हा प्रकल्प खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात नवी मुंबई पालिकेची 26 टक्के भागीदारी असून महापालिका 729 कोटी रुपयांची गुंतवणुक या प्रकल्पात करणार आहे. या प्रकल्पातून 27 मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मितीचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 19.5 टीपीडी बायोसिएनजी गॅस व 27.24 टीपीडी कंपोस्ट खत निर्मिती होणार आहे. या प्रकल्पात 250 केएलडी क्षमतेचा आधुनिक लिचेड प्रक्रिया प्रकल्प, 450 टीपीडी बायो मिथेनेशन प्लॅन्ट व 150 टिपिडी बायोचार प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पातून निर्मित होणाऱ्या वेस्ट हिटचा वापर करुन व्यवसाय व खाजगी संस्थांना चिल्ड वॉटर पुरवण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
सदर प्रकल्प 20 वर्षांच्या परिचलन कालावधीसाठी देण्यात आला असून त्यामधुन 143.31 दशलक्ष वीजनिर्मिती युनिट्स केली जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वीज मागणी 13 ते 14 दशलक्ष युनीटने कमी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रकल्पामुळे नवी मुंबई महापालिकेची 677 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे पालिकेला अभिप्रेत आहे.
हा प्रकल्प नवी मुंबईत साकारावा म्हणून स्थानिक आ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्य सरकारकडे सक्रियतेने पाठपुरावा केला आहे. या प्रकल्पासाठी पालिकेचे आवडते सल्लागार टंडन अर्बन सोल्युशनस प्रा. लि. यांची नियुक्ती केली आहे. मंदा म्हात्रे यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व पालिका आयुक्त यांचे विशेष आभार मानले असून हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नवी मुंबई सारख्या महापालिकेचा स्वतःचा असा कचऱ्यापासून निर्माण होणारा विजनिर्मिती प्रकल्प असावा असे ध्येय समोर ठेऊन अनेक वर्ष काम करत होत्या. त्यानुसार त्यांनी 25 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र दिलेले होते. सदर पत्रामध्ये नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारा घरगुती व औद्योगिक कचऱ्याच्या समस्येच्या पार्श्वभुमीवर तुर्भे येथे कच-यापासुन वीज निर्मीती प्रकल्प उभारण्याबाबतची मागणी केले होती.
त्यानुसार विषयांकित कामाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी 11 नोव्हेंबर 2025 रोजी डॉ. रवींद्र भराटे (अवर मुख्य सचिव, नगरविकास - 2) यांना या बाबत प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने डॉ.रवींद्र भराटे यांनी 25 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना सदर प्रकल्पबाबत सविस्तर प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्राय व आवश्यक कागदपत्रांसोबत सादर करण्याचे निर्देश दिले होते. सदर प्रकरणाचा सतत पाठपुरवठा करून अखेर 5 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणा-या घनकचरा व्यवस्थापनासाठी व विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 अन्वये एकात्मीक प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करणे या कामाचे यांना देण्यात आले असुन सदर कामाची संक्षिप्त टिप्पणी, प्रशासकीय मंजुरी आदेश, देण्यात आला. त्याची अधिकृत माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी 30 डिसेंबर रोजी अवर मुख्य सचिव डॉ. रवींद्र भराटे यांना सुपुर्द केली.
लवकरच नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणा-या घनकचरा व्यवस्थापनासाठी व विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 अन्वये एकात्मीक प्रकल्प सार्वजनिक खाजगी लोकसहभागातून तत्वावर सुरु केला जाणार असल्याची माहिती आमदार म्हात्रे यांनी दिली. तसेच सदर प्रकल्प उभारण्याकरिता अंदाजित 1800 ते 2000 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, सदर प्रकल्प नवी मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सदर पत्रकार परिषदेत; उपस्थित असलेल्या नवी मुंबईतील विविध सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांनी सदर विषयाबाबत मार्गदर्शन केले व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या हितासाठी आणलेल्या प्रकल्पाचे समाजसेवकांनी स्वागत केले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत नवी मुंबईतील विविध सामाजिक क्षेत्रात कार्य केलेले आर. बी. बर्वे, भरत गोलतकर, निखिल भंडारी, प्रवीणकुमार देशमुख, मधुकर कोळगे, विनायक तलाठी, श्रीकांत पत्की, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, विकास सोरटे, मंगेश चव्हाण, जयंत पाटील, मालती सोनी, संजय ओबेरॉय, आरती राऊळ, किरण वर्मा, शीतल जगदाळे, आदि उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने व पालिका आयुक्तांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प साकारला आहे. सदर प्रकल्प हा नवी मुंबईकरांच्या हिताचा असून यासारखे अनेक प्रकल्प शहरात उभे राहणे गरजेचे आहे.
- आमदार मंदा म्हात्रे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai