मार्च 2021 अखेरपर्यंत मिळणार घरांचा ताबा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2020
- 536
सिडको व्यवस्थापकीय संचालकांची महागृहनिर्माण बांधकाम स्थळांना भेट
नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च 2021 अखेरीस देण्याचा मानस असून नव्या वर्षात सिडकोच्या घरांची विक्री करण्याच्या योजनादेखील जाहिर करण्याचा सिडकोचा मानस असल्याचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थपाकीय संचालक यांनी स्पष्ट केले. सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील बांधकाम स्थळांना शुक्रवारी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी भेट देऊन बांधकाम कार्याचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील वाशी ट्रक टर्मिनस, खारघर रेल्वे स्थानक, खारघर बस टर्मिनस, खारघर बस आगार, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल (प.) बस आगार, खारघर, सेक्टर-43 आणि तळोजा, सेक्टर-21,28,29,31 व 37 या बांधकाम स्थळांना भेट दिली. दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी उपरोक्त बांधकाम स्थळांना भेट देऊन बांधकाम कार्याचा आढावा घेतला. सदर योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च 2021 अखेरीस देण्याचा मानस असल्याचे व नव्या वर्षात सिडकोच्या घरांची विक्री करण्याच्या योजनादेखील जाहिर करण्याचा सिडकोचा मानस असल्याचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थपाकीय संचालक यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर असून या योजनेमुळे नजीकच्या काळात अनेक कुटुंबांचे हक्काच्या घराचे आणि नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्याचे स्वप्न साकार होणार आहे, असे उद्गार या भेटी दरम्यान डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी काढले.
सिडकोने नेहमीच अत्यंत किफायतशीर दरात घरांची विक्री केली आहे. त्यामुळे सदर महागृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून सिडको प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीसाठी मोठे योगदान देणार असल्याचे मतही उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी यावेळी व्यक्त केले. त्याचप्रमाणे सदर गृहप्रकल्प हे परिवहन केंद्रीत असल्याने नागरिकांचा घर ते कामाचे स्थळ यातील प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai