कचरा टाकण्यासाठी गेलेला डंपर 100 फुट खाली कोसळला
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 01, 2021
- 704
डंपर चालकाचा मृत्यू ; संबधित कंपनीसह ठेकेदार व सुपरवायझरवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
नवी मुंबई : पनवेल मधील ओवळे गाव येथील डंम्पीग ग्राऊंडवर रात्रीच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेलेल्या डंपर चालकाला अंधारात अंदाज न आल्याने त्याच्या ताब्यातील डंपर 100 फूट खोल खड्डयात जाऊन पडल्याची व या अपघातात डंपर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर डंपिंग ग्राऊंडवर रात्रीच्यावेळी काम करण्याची परवानगी नसताना देखील आयजीबी कंपनी व राधाकृष्ण कंन्स्ट्रक्शन कंपनीने योग्य ती खबरदारी न घेता निष्काळजीपणे काम चालु ठेवल्यामुळे सदरचा अपघात घडल्याचे आढळुन आले. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार धरुन आयजीबी कंपनी व राधाकृष्ण कंपनीच्या संबधीत ठेकेदार व सुपरवायजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात मृत पावलेल्या डंपर चालकाचे नाव मोहम्मद अन्वर हुसेन (25) असे असून गत 24 डिसेंबर रोजी रात्री 11. 30 वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील ओवळे गाव येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी गेला होता. मात्र, सदर डंपिग ग्राऊंडवर विद्युत प्रकाश नसल्याने डंपर चालक मोहम्मद हुसेन याला अंधारात अंदाज न आल्याने त्याच्या ताब्यातील डंपर डंपिग ग्राऊंडवरुन 100 फुट खोल खाली कोसळला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी व ग्रामस्थांनी मोबाईल फोनच्या प्रकाशात शोध घेतला असता, कचऱयाचा डंपर 100 फुट खाली पडल्याचे व तेथील दगडामध्ये डंपर चालक जखमी अवस्थेत पडल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
या घटनेनंतर पोलिसांनी डंपिंग ग्राऊंडवर उपस्थित असलेल्या सुपरवाझर दिनेश माया सिंग व मॅनेजर जी.के.कुलकर्णी यांच्याकडे डंपींग ग्राऊंडवर रात्रीच्या वेळेस काम करण्याची परवानगी आहे का? याबाबत विचारणा केली असता, त्या दोघांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारची कागदपत्रे देखील सादर केली नाहीत. यावरुन सदर डंपिंग ग्राऊंडवर रात्रीच्यावेळी काम करण्याची परवानगी नसताना देखील आय.जी.बी.कंपनी व राधाकृष्ण कंन्स्ट्रक्शन कंपनीने योग्य ती खबरदारी न घेता निष्काळजीपणे काम चालु ठेवले. तसेच त्याठिकाणी विद्युत प्रकाशाची सुविधा उपलब्ध केली नाही, त्यामुळेच डंपर चालकाला अंधारात अंदाज न आल्याने त्याचा डंपर 100 फुट खाली कोसळून त्यात डंपर चालकाचा मृत्यू झाल्याचे आढळुन आले. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताला आयजीबी कंपनी व राधाकृष्ण कंपनीच्या संबधीत ठेकेदार व सुपरवायझरला जबाबदार धरुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai