‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ उपक्रमांतर्गत शाळाशाळांमधून जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2026
- 22
नवी मुंबई ः स्वच्छ भारत मिशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरू झालेल्या ‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये शहराचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचे संस्कार रूजविण्यावर भर दिला जात असून ज्या माध्यमातून शहराचे उद्याचे नागरिक हे स्वच्छताप्रेमी असतील.
याची सुरूवात नवी मुंबई महापालिकेच्या शाळांपासून करण्यात आलेली असून टप्प्याटप्प्याने खाजगी शाळा-महाविद्यालयांमध्येही नाविन्यपूर्ण जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येत आहे. ‘स्वच्छ सवयींमधून स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी 7 महत्वाच्या सवयींचे पालन करणे अपेक्षित आहे. याकरिता ए.जी.एनव्हायरो आणि आरंभ क्रिएशन्स कलासंस्था यांच्या माध्यमातून शाळांमध्ये मनोरंजनपर पथनाट्यातून स्वच्छतेच्या 7 सवयींविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. नवी मुंबई पालिकेच्या शाळा क्र. 6, 9, 10, 11 आणि 12 अशा 5 शाळांपासून या जनजागृती अभियानाची सुरूवात करण्यात आलेली असून सर्व 80 शाळांमध्ये पथनाट्य सादर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
स्वच्छतेच्या या 7 सवयींमुळे आजारांचा प्रसार रोखण्यास आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास मदत होणार असून त्याचीच माहिती रंजक पध्दतीने विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात येत आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक अशा सात सवयींमध्ये रस्त्यावर कचरा टाकू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, ओला सुका कचरा वर्गीकरण निर्मितीच्या ठिकाणी म्हणजे घरातूनच करावे, प्लास्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लास्टिक वापरण्याचे पूर्णपणे बंद करावे, हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत, ‘थ्री आर’ म्हणजे कचरा कमी करणे व कचऱ्याचा पुनर्वापर करणे आणि कचऱ्यापासून पुनर्निर्मिती करणे ही त्रिसूत्री उपयोगात आणावी, स्वच्छतागृहांचा वापर करावा व ती फ्लश करून स्वच्छ ठेवावीत अशा सात सवयींचा समावेश असून त्या आपल्या जीवनशैलीचा भाग व्हाव्यात असे आवाहन पथनाट्यासारख्या प्रभावी कलात्मक माध्यमातून करण्यात येत आहे. या पथनाट्यांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai