एनएमएमटीला विद्युत बसचा आधार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 04, 2021
- 639
नवी मुंबई : तोट्यात सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाला पुढील काळात विद्युत बसचा मोठा आधार मिळणार आहे. केंद्र शासनाच्या विद्युत वाहनांच्या धोरणामुळे (फेम योजनेअंतर्गत) वर्ष अखेरपर्यंत 230 विद्युत बस नवी मुंबई परिवहन सेवेत दाखल होणार आहेत. यातील 30 बस सध्या सेवा देत असून त्या फायदेशीर ठरत आहेत. तर 30 बस या महिनाअखेर परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
केंद्र शासनाच्या फेम योजनेअंतर्गत पर्यावरण पुरक विद्युत बस चालविण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा फेम 1 टप्पा संपला असून फेम 2 योजनेला गती देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई परिवहन उपक्रमासाठी 30 विद्युत बस अनुदानावर मिळाल्या आहेत. ‘फेम 2’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 100 विद्युत बससाठी महापालिकेने रीतसर प्रस्ताव पास करून त्याबाबत ठेकेदार निश्चित करून कार्यादेश दिला आहे. त्यामुळे या महिन्यात यातील 30 बस तर पुढील काही महिन्यात 70 बस मिळणार आहेत.
सध्या सुरू असलेल्या 30 बस फायदेशीर ठरत असल्याने पालिकेने 100 बसच्या प्रस्तावाव्यतिरिक्त केंद्राकडे अतिरिक्त 100 बसेसची मागणी केली होती. त्यालाही केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळे या 100 बस मिळण्यासाठी आता पालिका ठेकेदार निश्चिती करत असून ही प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे फेम 2 अंतर्गत परिवहन उपक्रमाला दोनशे विद्युत बस मिळणार असल्याने या वर्षअखेर शहरात 230 विद्युत बस धावतील असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. आहेत. या बस सध्या प्रवासी सेवा देत असून त्या पारंपरिक इंधनावर चालणार्या बसपेक्षा फायदेशीर ठरत आहेत.
अगोदरच नवी मुंबई परिवहन उपक्रम तोट्यात सुरू आहे. पालिकेच्या अनुदानावर त्याचे अवलंबित्व आहे. त्यातच कोरोनामुळे उपक्रमाच्या तोट्यात भर पडली आहे. परिवहन उपक्रमाचा तोटा चार कोटीवरून जवळजवळ 7.50 कोटीवर गेला आहे. यातून सावरण्यासाठी या विद्युत बसचा मोठा हातभार लागणार असल्याने याला प्राधान्य देत लवकरात लवकर या बस मिळविण्याचे नियोजन पालिका प्रशासन करीत आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात पालिका मालकीच्या 30 विद्युत बस कार्यरत असून ‘फेम 2’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 30 बस याच महिन्यात मिळणार आहेत. उर्वरित 70 बस पुढील काही महिन्यात मिळतील. तर आणखी 100 बसची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. या विद्युत बस शहरासाठी फायदेशीर ठरणार आहेत.
-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai