सेंट्रल पार्क 10 फेब्रुवारीपासून होणार खुले
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 03, 2021
- 629
नवी मुंबई ः कोविड-19 महासाथीच्या पार्श्वभूमिवर गेल्या 11 महिन्यांपासून बंद असलेले खारघर येथील सेंट्रल पार्क उद्यान 10 फेब्रुवारी 2021 पासून खुले करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. सेंट्रल पार्कमध्ये विरंगुळ्यासाठी तसेच व्यायामासाठी येणार्या ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना हा निर्णय सुखावणारा ठरणार आहे.
कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 22 मार्च 2020 पासून केंद्र व राज्य शासनातर्फे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. टाळेबंदी अंतर्गत उद्यानांसारखी सार्वजनिक ठिकाणेही बंद करण्याचे निर्देश दिले गेले असल्याने गेल्या सुमारे 11 महिन्यांपासून सेंट्रल पार्क उद्यानही नागरिकांकरिता बंद करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत कोरोनाचा कमी होत असलेला संसर्ग आणि शासनाच्या अनलॉक (टाळेबंदी शिथिलीकरण) प्रक्रिये अंतर्गत प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार सेंट्रल पार्क उद्यान खुले करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. सेंट्रल पार्कसारखे निसर्गसंपन्न, मनोरंजन, जॉगिंग इ. सोयी सुविधांनी युक्त असणारे उद्यान खुले होणार असल्याने खारघर परिसरातील नागरिकांना या निर्णयाचा निश्चितच फायदा होणार आहे. सेंट्रल पार्कमध्ये येणार्या नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे इ. कोविड-19 सुरक्षाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai