Breaking News
आमदार मंदाताई म्हात्रे यांचा यशस्वी पाठपुरावा
नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून बेलापूर गावातील ग्रामस्थ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता लहान सहान व्यापार करीत आहेत. त्यांना व्यापाराकरिता बंदिस्त गाळे मिळाव्यात यासाठी आ. मंदा म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. याला यश आले असून आयुक्तांनी बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळे धारकांना गाळे वितरीत करण्यात येतील असे स्पष्ट केले. सदर पात्र फेरीवाल्यांना 9x6 आकाराचे गाळे देण्यात येणार असून सदर मार्केट उभारणीकरिता आमदार निधी देण्यात येणार आहे.
बेलापूर गावातील ग्रामस्थ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता लहान सहान व्यापार करीत होते. सदर व्यापार करताना त्यांनी ग्रामपंचायतीपासून कर आकार भरला असून आजपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेचाही कर भरण्यात आला आहे. असे असतानाही सदर अधिकृत व्यापार्यांना डावलून महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण तोडक कारवाई केली गेली. सदर ग्रामस्थ व्यापार्यांना त्यांची दुकाने पुन्हा मिळावी व त्यांना न्याय मिळावा, याकरिता स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह बैठका घेतल्या होत्या तसेच शहर अभियंता यांच्याकडेही सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्याने महापालिका आयुक्त यांनी सकारात्मक निर्णय घेऊन बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळे धारकांना गाळे वितरीत करण्यात येतील असे स्पष्ट केले. सदर पात्र फेरीवाल्यांना 9x6 आकाराचे गाळे देण्यात येणार असून सदर मार्केट उभारणीकरिता आमदार निधी देण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. आ. मंदा म्हात्रे यांनी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल बेलापूर ग्रामस्थ फेरीवाला संघटना यांनी त्यांचे आभार प्रदर्शन करण्याकरिता बैठक आयोजित केली होती. यावेळी बेलापूर गावातील ज्येष्ठ नेते माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथदादा पाटील, रितेश पुरव व आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai