शिवरायांना अभिवादन

नवी मुंबई ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली.

तसेच महापालिका मुख्यालयात अँम्फिथिएटर येथेही शिवप्रतिमा पूजन करण्यात आले व राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या अर्धपुतळ्यासही पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता सुनिल लाड उपस्थित होते.