आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स नवी मुंबईचे भूषण ठरेल
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 23, 2021
- 601
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्गार
नवी मुंबई ः खारघरमध्ये साकारण्यात येत असलेल्या अन्य आंतरराष्ट्रीय प्रकल्पांबरोबरच विस्तारित 18 होल्सचे आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्सही नवी मुंबईचे भूषण ठरेल, याबाबत कोणतीही शंका नाही, असे उद्गार नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी काढले. सिडको मास्टर्स कप-2021 गोल्फ सामन्याचे उद्घाटन आणि 09 होल्सच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचा 18 होल्सच्या गोल्फ कोर्समध्ये विस्तार आणि आधुनिक सुविधांसह कंट्री क्लब विकसित करण्याच्या आराखड्यांचे अनावरण करतेवेळी त्यांनी हे उद्गार काढले. सामाजिक अंतरासह कोविड-19 सुरक्षाविषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, बिपिनकुमार सिंग, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, सुप्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस आणि सिडकोतील विभाग प्रमुख हेही उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी या वेळी बोलताना सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, कॉर्पोरेट पार्क आणि विस्तारित गोल्फ कोर्स हे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या नगर विकास क्षेत्राला नवीन दिशा देणारे ठरून, राज्याच्या व देशाच्या आर्थिक विकासातही मोलाचे योगदान देणारे ठरतील, असे प्रतिपादन केले. डॉ. संजय मुखर्जी यांनी 18 होल्सचे गोल्फ कोर्स तसेच कॉर्पोरेट पार्क प्रकल्पा अंतर्गत विश्वचषक फुटबॉल आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी साकारण्यात येणार्या सेंटर ऑफ एक्सलन्समुळे खारघर नोड भविष्यात स्पोर्टस हब म्हणूनही उदयाला येणार आहे. गोल्फ कोर्स हे नवी मुंबईतील एक आयकॉनिक स्थळ बनणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.
खारघर हा नवी मुंबईतील सर्वांत विस्तीर्ण नोड असून नजीकच्या काळात खारघर व परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, एरो सिटी, परिवहन केंद्रित गृहनिर्माण योजना, मेट्रो रेल्वे, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, मेडी सिटी, सेंटर फॉर एक्सलन्स, खारघर हिल्स प्लेट्यु असे महत्त्वाचे प्रकल्प साकार होणार असल्याने हा नोड निवासी, वाणिज्यिक, परिवहन व सांस्कृतिक सुविधांनी परिपूर्ण असणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai