17 जूनला दिव्यांगांकरिता विशेष लसीकरण

नवी मुंबई ः अतिवृष्टीच्या इशार्‍यामुळे 10 जून रोजी घोषीत करण्यात आलेले दिव्यांगांसाठीचे विशेष लसीकरण सत्र रद्द करुन पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे गुरुवार,17 जून 2021 रोजी  18 ते 44 वर्षावरील दिव्यांगांसाठीचे विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नेरुळ, ऐरोली आणि वाशी येथील पालिका रुग्णालयात हे लसीकरण होणार आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना रांग न लावता प्राधान्याने लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्ती कोव्हीड लसीकरणापासून वंचीत राहू नयेत याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते 5 या वेळेत माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय सेक्टर 15 नेरुळ, राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर 3 ऐरोली व इ.एस.आय.एस. रुग्णालय सेक्टर 5 वाशी अशा 3 ठिकाणी लसीकरण होणार आहे. या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.