जेएनपीटीने सुरू केला इलेक्ट्रिक वाहनांचा वापर

मुंबई :मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील कंटेनर हाताळणी करणारे एक प्रमुख बंदर आहे. ग्रीनपोर्ट (हरितबंदर) उपक्रमांतर्गत व शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून जेएनपीटीने आपल्या प्रचालन क्षेत्रामध्ये 9 इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. या वाहनांचा वापर मुख्यत: बंदराच्या प्रचालन क्षेत्रामध्ये कामगारांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करण्यासाठी केला जाणार आहे. 

जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, यांनी या इलेक्ट्रिक वाहनांचे उद्घाटन केले. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ व सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते. विद्युत वाहनांचा वापर हे जेएनपीटीच्या ‘ग्रीनपोर्ट’ उपक्रमाशी सुसंगत असून जेएनपीटीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक पर्यावरण अनुकूल वाहतूक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे बंदराच्या शाश्वत व हरित उपक्रमांच्या यादीमध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. ई-वाहने ही शून्य-उत्सर्जन वाहने असल्याने यांच्या वापारामुळे जेएनपीटी हरित व ऊर्जा- कार्यक्षम वाहतुक पर्याय निर्माण करण्यास सक्षम बनेल. जेएनपीटीने या नवीन ई-वाहनांसाठी एकडे डिकेटेड चार्जिंग स्टेशन देखील कार्यान्वित केले आहे.

यावेळी संजय सेठी म्हणाले,  बंदराच्या कामकाजाचा बंदर परिसरातील पर्यावरण व आसपासच्या समुदायांवर कमीत-कमी प्रभाव होईल यासाठी जेएनपीटीने सातत्याने शाश्वत उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. जेएनपीटीचे उद्दिष्टकेवळ आर्थिकदृष्ट्या संपन्न होणे नसून पर्यावरणीय आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त करणे हे सुद्धा प्रमुख उद्दिष्ट आहे. ई-वाहनांचा देखभालीसाठीचा खर्च कमी असून इंधनावरील खर्च व अवलंबित्व कमी होईल. ई-वाहनांचा वापर सुरू केल्याने आता जेएनपीटीचे स्थान शाश्वत जागतिक बंदरांच्या बरोबरीचे झाले आहे.