सिडकोच्या नाकर्तेपणामुळे आमरण उपोषणाचा इशारा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 25, 2021
- 736
श्रीगणेश सहकारी सोसायटीतील वाद पुन्हा पेटला
नवी मुंबई ः सहकार विभागाने आणि सिडकोने निर्देश देऊनही आपल्याला श्रीगणेश सहकारी सोसायटीचे सभासद करुन घेतले जात नाही. सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करुनही याबाबत स्वतःच्या नावाने घर नोंदणी करण्यासाठी सिडको ना हरकत प्रमाणपत्र देत नाही म्हणून सोसायटीतील रहिवाशी मनोहरलाल शर्मा यांनी आमरण उपोषणचा इशारा सिडकोला दिला आहे.
गेली अनेक वर्षे नेरुळ येथील श्रीगणेश गृहनिर्माण सहकारी संस्था आणि त्यातील रहिवाशी यांमध्ये सभासद करुन घेण्याबाबत वाद सुरु आहेत. संबंधित गृहनिर्माण संस्थेने सहनिंबधक सहकारी संस्था (सिडको) यांच्या आदेशाची अमंलबजावणी न केल्यामुळे सदर भूखंड वाटप रद्द करण्याची नोटीस जुन 2019 मध्ये सिडकोने संबंधित संस्थेला देऊनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही असा आरोप शर्मा यांनी केला आहे. शर्मा यांनी सन 1999 मध्ये संस्थेच्या सदस्या कुसुम विरा यांच्याकडून या गृहनिर्माण संस्थेतील सदनिका विकत घेतली होती. सदर सदनिका आपल्या नावाने सिडको व गृहनिर्माण संस्थेकडे नोंदणी व्हावी म्हणून अनेकवेळा सिडकोकडे ना हरकत दाखल्याची मागणी करुनही अद्यापपर्यंत दिलेला नाही. सदर सदनिका गृहनिर्माण संस्थेत आपल्याला सदस्य म्हणून नोंदवून घेण्याचे सह निंबधकांनी दिलेले आदेशही अद्यापपर्यंत संस्थेने पाळले नसल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे. संस्थेने मुळ रेकॉर्ड नष्ट करुन बनावट रेकॉर्ड तयार केला असल्याचा आरोप करुन याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आपल्याप्रमाणे अनेकजणांना अद्यापपर्यंत श्रीगणेश सहकारी गृहनिर्माण संस्थेेन सदस्यत्व दिलेले नाही. सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करुनही याबाबत स्वतःच्या नावे नोंदणीसाठी सिडको ना हरकत प्रमाणपत्र देत नाही. या अन्यायापोटी आपण 27 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत. - मनोहरलाल शर्मा
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai