एसआयईएस महाविद्यालयात ओपन माईक स्पर्धा उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 25, 2021
- 985
नवी मुंबई : एसआयईएस कॉलेज नेरुळ येथे हिंदी परिषदेच्या वतीने 22 सप्टेंबर 2021 रोजी आंतर-महाविद्यालयीन ओपन माइक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 38 महाविद्यालयीन विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग झाले होते.
पर्यावरण प्रेमी आणि प्रसिद्ध हास्य कवी डॉ मुकेश गौतमजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. करोना काळात त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. आणि उत्साहवर्धक मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या सुप्रसिद्ध शैलीमध्ये एक विनोदी कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. ज्युरी म्हणून हिंदी साहित्य आणि तंत्रज्ञानाशी संबंधित तीन तज्ञ उपस्थित होते. यात राधिकाबाई दत्ता मेघे कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी प्राध्यापक अशोक जाधवर, डॉ.आशिष शुक्ला आणि प्राध्यापिका निशा बरनवाल यांचा समावेश होता.
या स्पर्धेत रुपारेल महाविद्यालयाची दनिया खान हिने प्रथम पारिचोषिक पटकावले तर दुसरे पारितोषिक - मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाच्या हिबा शेख आणि मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सची स्वाती सिंह या दोन्ही विद्यार्थिनींना मिळाले. तिसरे पारितोषिक एसआय ईएस कॉलेजची विद्यार्थिनी साक्षी टापरे हिला मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी सुत्रसंचालनचे कार्य यशस्वीपणे केले. प्राध्यापिका सुनीता अंभोरे यांनी सर्व पाहुण्यांचे आणि स्पर्धकांचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai