निसरड्या पदपथांमुळे नागरिक हैराण
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 25, 2021
- 361
नवी मुंबई : वाशी सेक्टर 10 मधील अरूणकुमार वैद्य मैदानातील पदपथ शेवाळ वाढल्याने निसरडे झाले आहेत. त्यामुळे नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. तसेच पदपथावरील कचर्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात स्वच्छता अभियान राबविले. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. परंतू अभियान संपताच महापालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे निर्दशनास आले आहे. शहरातील अनेक पदपथांवर कचर्याचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी पदपथ शेवाळल्याने निसरडे झाले आहेत. वाशी सेक्टर 10 मधील अरूणकुमार वैद्य मैदानातील पदपथांची सुद्धा अशीच अवस्था आहे. याठिकाणी नवरात्रीमध्ये देवीची स्थापना केली जाते. दहा दिवस भाविक दर्शनासाठी येत असतात.
नवरात्री जवळ आल्याने या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशी मागणी येथील समाजसेविका उर्मिला सुरेश शिंदे यांनी केली असून त्याबाबत पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai