रेपो दर ‘जैसे थे’ ठेवल्यामुळे ठेवीदारांसाठी मंदी, कर्जदारांची चांदी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2021
- 493
मुंबईः रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपोदर कायम ठेवले आहेत. त्याचा परिणाम जुन्या, नव्या कर्जदारांची चांदी होणार असली, तरी मुदत ठेवीत गुंतवणूक करणार्यांना मात्र कमी परतावा मिळणार आहे. त्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी होणार आहे.
रिझर्व्ह बँकेने सलग नवव्यांदा रेपो दर कायम ठेवले आहेत. यापूर्वी मे 2020 मध्ये रेपो दर कमी करण्यात आला होता. पतधोरण कायम ठेवल्यामुळे बँकेत मुदत ठेव असेल किंवा करणार असाल तर तोटा होण्याचाच संभव आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा परिणाम मुदत ठेवीवरील व्याजदरांवर होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपोदर कमी केले असते तर कमी व्याज मिळालं असतं. रेपो रेट वाढवला असता तर मुदत ठेवीवर जास्त व्याज मिळालं असतं. ठेवी आणि कर्ज दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणजेच कर्जावरील व्याजदर कमी असेल, तेव्हा ठेवीवरील व्याजदरदेखील कमी असतो.
बँका मुदत ठेवीवर पाच ते सहा टक्के व्याज देतात, तर कर्जावर बँका सात-टक्के व्याज आकारतात. व्याज हे बँकेच्या उत्पन्नाचं मुख्य स्त्रोत असतं. बँकेकडे स्वतःचे पैसे खूप कमी आहेत. कर्जाप्रमाणे, बँकांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर कमी पातळीवर आहेत. काही तज्ज्ञांचं मत आहे की रिझर्व्ह बँक येत्या काळात रेपो दर वाढवू शकते. पूर्वीची मुदत ठेव असेल तर जास्त काळासाठी ती रिन्यू करू नका. सहा महिन्यांनतर रेपो दर वाढू शकतो. त्यानंतर नवीन मुदतठेवीत पैसे गुंतवण्याची संधी आहे. जादा परतावा मिळायचा असेल तर वेगवेगळ्या कालावधीसाठी पैसे वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवा. समजा, एक लाख रुपये गुंतवायचे असतील तर ते एकाच वेळी एकाच ठिकाणी गुंतवण्याऐवजी चार ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणं जास्त श्रेयस्कर ठरेल. यामधून 25-25 हजार रुपये 1 वर्ष, दोन वर्षं, तीन वर्षं आणि चार वर्षांसाठी गुंतवले तर जास्त फायदा होईल. अनेक बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या फ्लोटिंग रेट मुदत ठेवीदेखील देतात. अशा ठेवींमध्ये, फायदा वाढवणं आणि दर वाढवणं आणि कमी होणं या दोन्ही गोष्टी आहेत. याचा अर्थ आता व्याजदर आणखी वाढणं अपेक्षित आहे. फ्लोटिंग रेट ठेवीवर सध्या बहुतेक बँका 5.40 टक्के दराने व्याज देत आहेत. अशा परिस्थितीत बिगरवित्तीय संस्थांमधून फ्लोटिंग रेट ठेवींवर एक ते दीड टक्का अधिक व्याज मिळू शकतं. ज्येष्ठ नागरिकांना रिझर्व्ह बँकेचे फ्लोटिंग रेट बाँड घेता येऊ शकतात. त्यावर सध्या 7.15 टक्के दराने व्याज मिळत आहे. त्याचा कालावधी सात वर्षं आहे. यासाठी आधीच सरकारच्या अनेक योजना आहेत, ज्यावर व्याजदर जास्त मिळत आहेत. कंपन्यांच्या मुदत ठेवीवरदेखील निर्णय घेऊ शकतो. बँकांच्या मुदत ठेवींमध्ये जायचं नसेल, तर कंपन्यांच्या मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवण्याचा निर्णय घेता येईल. कंपन्यांच्या एफडीवर तीन तेसहा टक्के जास्त व्याज मिळू शकतं.
गृहकर्जावरील व्याज दरामध्ये अर्ध्या टक्क्याची तफावत असली तरी कर्ज बदलायला हवं, असं तज्ज्ञांचं मत आहे. जुनं कर्ज स्विच करता येतं. यासाठी कर्ज किमान दोन वर्षं जुनं असणं आवश्यक असतं. शिवाय बर्याच बँका असं निश्चित कर्ज अकाली बंद करण्यासाठी शुल्क आकारतात. ते कमी असेल आणि व्याजदरामध्ये जास्त फरक असेल तर कर्ज बदलण्याचा विचार करता येईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai