कमर्शिअल वाहनांसाठी अच्छे दिन!
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2021
- 473
मुंबईः कोरोनाच्या प्रकोपातून आता देश सावरत आहे. त्याचा परिणाम आता वाहन उद्योगावर व्हायला लागला आहे. कमर्शिअल व्हेईकलची मागणी वाढायला लागली आहे. दुसरीकडे दुचाकींची मागणी मात्र त्या प्रमाणात वाढली नाही.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या मते सप्टेंबर 2021 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 5.27 टक्क्यांनी कमी झाली. सप्टेंबरमध्ये एकूण 12 लाख 96 हजार 257 वाहनांची विक्री झाली. सप्टेंबर 2020 मध्ये हा आकडा 13 लाख 68 हजार 307 वाहनांचा होता. म्हणजेच वार्षिक आधारावर 72 हजार पन्नास वाहनांची विक्री कमी झाली. गेल्या महिन्यात सर्वात जास्त वाढ तीनचाकी विभागात दिसून आली आणि सर्वात मोठी घट ट्रॅक्टर विभागात दिसून आली. ट्रॅक्टर विभागात एका वर्षापूर्वी 39.13 टक्क्यांची वाढ होती, जी या सप्टेंबरमध्ये 23.85 टक्क्यांनी घसरली. सप्टेंबर 2021 मध्ये तीन चाकी वाहनांची विक्री 50.90 टक्क्यांनी वाढली. एक वर्षापूर्वी या विभागात 37.40 टक्क्यांची घट झाली होती. गेल्या महिन्यात या विभागात 36 हजार 612 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात या विभागाची विक्री 24 हजार 262 युनिट्स होती.
तीन-चाकी विभागानंतर व्यावसायिक वाहन विभागात मोठी वाढ झाली. गेल्या महिन्यात या विभागात 58 हजार 820 वाहने विकली गेली. त्यात 46.64 टक्के वाढ झाली. या विभागातल्या जड व्यावसायिक वाहनांमध्ये 189.29 टक्के मोठी वार्षिक वाढ दिसून आली. गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी वाहन विभागात वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. गेल्या महिन्यात या विभागात दोन लाख 33 हजार 308 वाहनं विकली गेली. त्यात 16.32 टक्के वाढ झाली. सप्टेंबर 2020 मध्ये हा आकडा दोन लाख 576 होता. या विभागात 30.90 टक्क्यांची वाढ झाली. चांगली गोष्ट म्हणजे सेमीकंडकंडक्टरच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठी तफावत असूनही कारविक्रीचे आकडे वाढतच गेले. दुसरीकडे, दुचाकी विभागात गेल्या महिन्यात 11.54 टक्क्यांनी घट झाली. सप्टेंबर 2021 मध्ये नऊ लाख 14 हजार 621 दुचाकींची विक्री झाली. वर्षभरापूर्वी सप्टेंबर महिन्यात हा आकडा 10 लाख 33 हजार 895 युनिट होता. म्हणजेच एक लाख 19 हजार 274 दुचाकींची विक्री कमी झाली.
- ट्रॅक्टरच्या मागणीत मोठी घट
कोरोना साथीच्या काळात ट्रॅक्टर विक्रीमध्ये वेगाने वाढ झाली; पण आता त्याची मागणी कमी झाली आहे. गेल्या महिन्यात या विभागात 23.85 टक्के घट होऊन 52 हजार 896 ट्रॅक्टर विकले गेले. वर्षभरापूर्वी, याच महिन्यात हा आकडा 69 हजार 462 ट्रॅक्टर इतका होता. सप्टेंबर 2019 मध्ये या विभागात 39.13 टक्क्यांची वाढ झाली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai