Breaking News
नवी मुंबई : संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत संत निरंकारी सत्संग भवन, सेक्टर 19-डी वाशी, येथे 10 ऑक्टोबर, 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 68 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढी द्वारे निभावण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक मनोहर सावंत, स्थानिक मुखी अनिल शिंदे तसेच सेवादल क्षेत्रीय संचालक अरुण पाटील यांच्या व्यतिरिक्त मंडळाचे अनेक प्रबंधकगण उपस्थित होते. उद्घाटनाच्यावेळी आपल्या भावना प्रकट करताना डॉ.संजीव नाईक यांनी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणूकीचे स्मरण करुन देत म्हटले, की बाबाजींनी रक्तदान शिबिरांचीही श्रृंखला जेव्हा सुरु केली तेव्हा असेच उद्गार काढले होते, की ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ ते पुढे म्हणाले, की संत निरंकारी मिशन रक्तदानाबरोबरच इतर अनेक सामाजिक सेवांमध्ये मानवसेवेच्या भावनेतून निरंतर योगदान देत आहे. मिशनचे कार्य प्रशंसनीय असून अनुकरणीय आहे. उल्लेखनीय आहे, की कोरोना महामारीच्या कालखंडात मागील वर्षभरात मिशन द्वारे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये आतापर्यंत 44 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून गरजेनुसार 24 शिबिरे संत निरंकारी रक्तपेढीमध्येच घेण्यात आली. एकंदर वर्षभरात जवळपास 4500 युनिट रक्तदान करण्यात आले असून महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागात सातत्याने ही श्रृंखला जारी आहे. या रक्तदान शिबिरामध्ये वाशी, कोपरखैरणे, सानपाडा इत्यादी परिसरातील निरंकारी भक्तांनी भाग घेतला. बदलापूर येथे राहणार्या एका भक्ताने तसेच ऐरोली येथील एका भक्तानेही या शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. वाशी येथील याशिबिराचे यशस्वी आयोजनमंडळाच्या स्थानिक मुखीच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादलाच्या वाशी युनिटचे महिला व पुरुष स्वयंसेवक तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai