25 दिवसांनी आर्यनची ‘मन्नत’ पुर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 28, 2021
- 973
उच्च न्यायालयाकडून आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर
मुंबई ः गेल्या 25 दिवसांपासून ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. यामुळे त्याचे वडील आणि बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खानला दिलासा मिळाला आहे.
भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर आहेत. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली. ड्रग्ज केस प्रकरणी कोठडीत असणार्या तिघांच्याही सुटकेचे आदेश शुक्रवारी किंवा शनिवारी मिळणार असून तेव्हाच ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती बचावपक्षाच्या वकिलांनी दिली. एनसीबीनं, सदर प्रकरण हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचा युक्तिवाद केला होता. पण, अखेर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांनाही कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान सदर प्रकरणी आता एनसीबी पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. तूर्तास शाहरुख खानला मोठा दिलासा मिळाला. याबाबतचा सविस्तर आदेश कोर्ट उद्या पोलिसांना देईल. त्यानंतर तिन्ही याचिकाकर्ते उद्या संध्याकाळी किंवा शनिवारी तुरुंगाबाहेर येतील, असं वकील मुकुल रोहतगी यांनी माध्यमांना सांगितलं. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai