लेखा विभाग अँटी करप्शनच्या रडारवर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 29, 2021
- 760
नवी मुंबई ः राज्यात अँटी करप्शन विभागाचा भ्रष्टाचार विरोधी सप्ताह सुरु असून लेखा विभागाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन संबंधित विभागाने पालिकेची झाडाझडती सुरु केल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळत आहे. दिवाळीच्या तोंडावर अँटी करप्शन विभागाच्या पालिकेतील फेर्या वाढल्याने अधिकार्यांचे धाबे दणाणले असून यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ‘लक्ष्मी’ चा धावा सुरु केला आहे.
राज्यात अँटी करप्शन विभागाचा भ्रष्टाचार विरोधी सप्ताह सुरु आहे. या पार्श्वभुमीवर अँटी करप्शन विभागाचे अधिकारी निरनिराळ्या शासकीय संस्थांना भेट देत असून तेथे भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यासाठी कार्यालयाच्या दर्शनीभागावर फलक लावून आवाहन करत आहेत. नवी मुंबई महापालिकेतही अँटी करप्शन विभागाच्या अधिकार्यांच्या फेर्या वाढल्याने पालिकेच्या अधिकार्यांची बोबडी वळली आहे. पालिकेच्या लेखा विभागाच्या टक्केवारीच्या अनेक तक्रारी नवी मुंबईतील अँटी करप्शन कार्यालयात काही कंत्राटदारांनी केल्याचे सुत्रांकडून कळत आहे. लेखा विभागात बिलाच्या टक्केवारीवर वसूली केली जात असल्याची चर्चा पालिकेत असून याबाबत संबंधित अधिकार्यांची लेखी तक्रार पालिका आयुक्तांनाही केली असल्याचे कळते. परंतु, पालिकेने या तक्रारीवर कोणतीही कारवाई न केल्याने काही ठेकेदारांनी याबाबत अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केल्याचे कळत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर संबंधित विभागाच्या अधिकार्यांच्या फेर्या पालिकेत वाढल्याने अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत. काही अधिकार्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत तर काही अधिकार्यांनी लक्ष्मीचा धावा सुरु केल्याची चर्चा पालिकेत आहे. वास्तविक पाहता, शासनाच्या प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार पालिकेच्या प्रशासन विभागाने पालिकेतील संशयीत अधिकार्यांची गोपनीय यादी बनवून ती अँटी करप्शन विभागाकडे सुपुर्द करणे गरजेचे आहे. परंतु, पालिका प्रशासनाने शासनाच्या या निर्देशांबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगितले. अँटी करप्शन विभागाच्या वावराने तरी ठेकेदारांची दिवाळी गोड होईल अशी प्रतिक्रिया काही ठेकेदारांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai