शिष्यवृत्तीचे पैसे परत मागणार्या महाविद्यालयांवर कारवाई करा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 17, 2021
- 427
समाज कल्याण आयुक्त यांची कुलगुरूंकडे मागणी
नवी मुंबई : समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेबाबत राज्यातील विविध महाविद्यालयाकडुन विद्यार्थांकडे रक्कम जमा करणेसाठी मागणी होत आहे. यासंदर्भात राज्यातील समाज कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे केलेल्या तक्रारींची गंभीर नोंद समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेतली असून अशा महाविद्यालयांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी विद्यापीठांच्या कुलगुरुंकडे 15 ऑक्टोबर 2021 च्या पत्राद्वारे केली आहे.
केंद्र पुरस्कृत भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती फ्रीशिप योजना या सर्वात महत्त्वाच्या योजना आहेत. या योजनांतर्गत, अनुसूचित जातीच्या दरवर्षी सुमारे 4. 5 लाख अर्जांची विद्यार्थ्यांकडून संपूर्ण राज्यात नोंदणी केली जाते. सदर शिष्यवृत्ती योजनांसाठी, शासनाने 2003 पासून वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एखाद्या अभ्यासक्रमांत प्रवेशित असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने, संस्थेने कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी करु नये अथवा शुल्क भरण्यासाठी आग्रह करून कागदपत्रांची देखील अडवणूक करण्यात येऊ नये अन्यथा महाविद्यालयांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश आहेत. असे असताना देखील, शासनाची मार्गदर्शक तत्त्वे आणि समाज कल्याण विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या निर्देशांना न जुमानता अनुसूचित जातीच्या विद्यार्थाना विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक महाविद्यालये, संस्था सशर्त प्रवेश देत आहेत आणि विद्यार्थ्यांनी आधी शुल्क भरावे व नंतर शिष्यवृत्तीची परतफेड करावी अशी मागणी देखील करत आहेत.
दरम्यान, शासनाने जारी केलेल्या कायद्याच्या आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. अशा बेकायदेशीर मागणीमुळे योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकातील वंचित समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. अशा महाविद्यालयांत कागदपत्र, निकाल देण्यासाठी अडवणुक होत असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी शासनाकडे तसेच राज्यातील समाज कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे तक्रारी केल्या आहेत. त्याअनुषंगाने सदर तक्रारीची गंभीर नोंद समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेऊन अशा माहविद्यालयांव कारवाईची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. अशा शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि प्रमुखांना शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना विद्यापीठ स्तरावर त्वरित द्याव्यात अन्यथा सरकारी आदेशांचे पालन न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असेही विद्यापीठांना देण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai