उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार्यांना डोस
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 10, 2021
- 1143
नवी मुंबई ः पनवेलमधील विविध नागरी समस्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार गुरुवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केला होता. यावेळी पुनर्विकास, पाणी प्रश्न, मालमत्ता कर यासारख्या सुविधा सोडवण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या. तसेच सिडको आणि पालिका यांनी समन्वय साधून पनवेलचे रखडलेले सर्व विषय मार्गी लावण्याचे आदेश पवार यांनी अधिकार्यांना दिले.
अपुर्या सुविधांमुळे अनेकवेळा नागरिकांकडून निवेदन दिले जात होते. या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक यंत्रणेला सूचना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पनवेल महापालिकेला भेट दिली. यावेळी जनता दरबारमध्ये नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिकेसंदर्भातील विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी सिडको व पालिका दोघांच्या कारभारावर टिका केली. पनवेल पालिका क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी देहरंग धरणाची उंची वाढवणे, नागरिकांना पायाभुत सुविधा देणे, मालमत्ता कर, सिडकोकडून मालमत्ता व भुखंड हस्तांतरण यासारखे प्रश्न सिडको आणि पालिका यांनी समन्वय साधून मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. तसेच तसेच आयुक्तांनी स्वतः पालिका क्षेत्रातील कामांची पाहणी करावी, असेही सांगितले. मालमत्ता कराचा प्रश्न लवकरच सोडविण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. पालिका क्षेत्रातील वाहतुक कोंडीवर बोलताना कळंबोली सर्कल त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यावरील पार्किंगबाबत उपमुख्यमंत्री यांनी पोलीस आयुक्त यांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai