मतदार नोंदणीसाठी बोगस कागदपत्र सादर
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 14, 2021
- 715
22 जणांविरोधात गुन्हा दाखल
नवी मुंबई : निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्यांचा पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत नाव नोंदणी, फोटो लावणे, दुरुस्ती करणेचा कार्यक्रम 5 डिसेंबरपर्यंत सुरु होता. यात बेलापूर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी बोगस कागदपत्र सादर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी 22 जणांविरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्यांचा पुर्नरिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. नाव नोंदणी करणे तसेच नावात दुरुस्ती करणे किंवा वगळणे यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाइन व ऑफलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी नमुना 6 द्वारे अर्ज करता येतो. त्यासाठी अर्जदाराला त्याचा रहिवासी पुरावा म्हणून वीजदेयक, पाणीपट्टी देयक, आधारकार्ड पॅनकार्डसह विविध कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. नवीन मतदार नोंदणीकरता राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतात. त्याद्वारे नियमानुसार कागदपत्रे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाद्वारे नेमण्यात आलेल्या मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जदारांच्या पत्त्यावर जाऊन कागदपत्रांची सत्यता तपासणी केली जाते. संबंधित अधिकार्याच्या अहवालानुसार पुढील ऑनलाइन नोंद केली जाते. परंतु बेलापूर 151 मतदारसंघात सीवूड्स व नेरुळ विभागातील 22 अर्जदारांनी खोटी वीजदेयक कागदपत्रे जोडल्याचे निदर्शनास आल्याने 22 जणांविरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदार नोंदणी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात बोगस नावे घुसवली जात असल्याचा आरोप नवी मुंबईतील विविध राजकीय नेत्यांनी केला आहे.
भारतीय निवडणूक आयोगामार्फत करण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये 22 जणांनी बोगस कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी बेलापूर ठाण्यात एफआरआय करण्यात आली आहे. याबाबत नियमानुसार पोलिसांमार्फत व निवडणूक विभागामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. - ज्ञानेश्वर खुटवड, निवडणूक अधिकारी,151 बेलापूर मतदार संघ
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai