सोनखार स्पोर्ट्स फेस्टिव्हलची शानदार सांगता
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 29, 2021
- 418
नवी मुंबई ः सोनखार स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनतर्फे 23 ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये सोनखार स्पोर्ट्स फेस्टिव्हल 2021 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप पारितोषिक वितरण समारंभ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणासह 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 9 दरम्यान सानपाडा सेक्टर 16 येथील गुनीना मैदानात मोठ्या थाटात संपन्न झाला.
माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व युवानेते निशांत भगत यांच्या वतीने सानपाडा प्रभाग क्र.77 व 78 मधील सेक्टर 1, 13 ते 19 मधील नागरिकांकरिता सर्व वयोगटांतील क्रीडाप्रेमी भाग घेऊ शकावेत म्हणून डिसेंबर महिन्यात प्रतिवर्षी सोनखार स्पोर्ट्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. यंदा देखील योगा, हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, मिनी मॅरेथॉन, स्केटिंग, सायकलिंग, कराओके (गायन), बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, नेमबाजी या क्रीडा प्रकारातील स्पर्धांसह 8 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेषतः जयपुरीयर स्कूल येथील मैदानात मिलीटरी ऍक्टिव्हिटीज सराव म्हणून ठेवण्यात आल्या होत्या. सर्व क्रीडा प्रकारांमध्ये सानपाडा पामबीच मधील सर्व सोसायट्यांमधील लहानांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धाप्रकारांमधील विजेत्यांना पारितोषिके देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच नगरसेविका जनसंपर्क कार्यालयामार्फत बनविण्यात आलेल्या शासनाच्या जेष्ठ नागरिक कार्डांचे वितरण देखील यावेळी जेष्ठ नागरिक माता भगिनींना सन्मानपूर्वक करण्यात आले. कार्यक्रमाला दोन्ही प्रभागातील नागरिकांसह पामबीच- सोनखार जेष्ठ नागरिक सेवा समितीचे सर्व सदस्य, नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी, सर्व क्रीडा प्रकारांचे समन्वयक, सर्व सोसायटीतील अध्यक्ष, सचिव,खजिनदार व पदाधिकारी त्याचप्रमाणे उपस्थित खेळाडू आणि महिला पुरुष, तरुण-तरुणींच्या उपस्थितीत नवीन वर्षाचे स्वागत लहान मुलांनी केक कापुन केले व सोनखार स्पोर्ट्स फेस्टीवलचा शानदार समारोप करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai