सिडकोच्या 5730 घरांची लॉटरी जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 26, 2022
- 855
नवी मुंबई : सर्वसामान्यांच्या परवडणार्या घरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकाच्यावतीने तळोजा नोडेमधील 5730 घरांची सोडत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काढण्यात आली आहे. एकूण घरांपैकी प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी 1524 घर उपलब्ध असून उर्वरित 4206 घरे सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. 24 फेब्रुवारी पर्यत अर्ज करून नोंदणी करता येणार आहे.
73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोच्या वतीने तळोजा सेक्टर 21,22,27, 34, 36, 37 मधील 5730 घरांच्या सोडतीला सुरुवात करण्यात आली आहे. आजपासून फॉर्म भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून पुढील महिनाभर ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या 5730 घरं तळोजा येथे गृहनिर्माण योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 1524 घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत. या मधील लाभार्थ्यांना अडीच लाखाच्या अनुदानाचा लाभ होणार आहे. उर्वरित घर सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील. सर्व नागरिकांच्या परवडणार्या घरांसाठी शासन कटिबद्ध आहे. सिडकोच्या लॉटरीसाठी नोंदणीला आजपासून सुरुवात होत असून 24 फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी https://lottery.cidcoindia.com
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai