अर्थसंकल्पात डिजिटलायझेशनवर भर
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 01, 2022
- 622
कर रचनेत कोणताही बदल नाही ; सर्व राज्यांसाठी 1 लाख कोटींची तरतूद
नवी दिल्ली : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच अर्थसंकल्पात डिजिटल क्रांती, ई-सेवांवर भर देण्यात आल्याचे दिसत आहे. कर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नसल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. इलेक्ट्रिक वस्तू, कपडे वस्त होणार आहेत.
2022-23 साठी सर्व राज्यांना मदत करण्यासाठी 1 लाख कोटींची तरतूद आहे. एक लाख कोटी ही रक्कम राज्यांच्या एकूण गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणार आहे. हा निधी पुढील 50 वर्षांसाठी असेल यावर कुठलेही व्याज आकारले जाणार नाही. नदीजोड प्रकल्पासंदर्भात घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात त्यांनी सिंचन-पिण्याचे पाणी वाढवण्यावर भर दिला आहे. जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचे कामही केले जाणार आहे. बजेटमध्ये फिनटेक आणि डिजिटलायझेशनवर स्पष्ट भर देण्यात आला आहे. तर प्राप्तीकर भरणार्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षीही कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कर रचना समान असणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शिक्षणाबाबत केलेल्या घोषणांमध्ये डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी डिजिटल युनिव्हर्सिटी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनल 200 टीव्ही चॅनलपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पूर्वीपासून असलेल्या सुविधांचा विस्तार करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला काय मिळाले?
- आरबीआयचे डिजिटल चलन
- चिप असलेले पासपोर्ट
- ईलेक्ट्रिक वाहन बॅटरी अदलाबदली धोरण
- देशात 60 लाख नव्या नोकर्या
- पोस्टात कोअर बँकिंग सुविधा
- रसायन, कीटनाशकमुक्त शेतीला प्राधान्य
- संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी 25 टक्के बजेट
- शालेय शिक्षणासाठी 100 टीव्ही वाहिन्या
- 2022 मध्ये 5 जी सेवा सुरु करणार
- 3.8 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी
- मालमत्ता नोंदणी कुठूनही करण्याची सुविधा
- क्रिप्टो करन्सी कमाईवर 30 टक्के कर
- 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट लागू केला जाईल.
- सौर ऊर्जा निर्मितीसाठी 19,500 कोटी
- राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींचे पॅकेज
- आयकर रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास दिलासा
- करचुकवेगिरी प्रकरणात छापा मारल्यास सर्व संपत्ती जप्त
- भांडवली खर्च 35.4 टक्क्यांनी वाढवणार
- लष्करात आत्मनिर्भरता
- स्टार्टअपसाठी 2023 पर्यंत करसवलत
- आयकरात कोणताही बदल नाही
- कपडे, चमड्याच्या वस्तू स्वस्त होणार
- परदेशातून येणारी यंत्रे स्वस्त होणार
- मोबाईलसह इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त होणार
- देशातील संपूर्ण लँड रेकॉर्ड डिजिटल होणार
- एक देश, एक रजिस्ट्रेशन योजना
- पहिली ते बारावीसाठी तब्बल 100 नवीन टीव्ही चॅनेल
- डिजिटल विद्यापीठाची स्थापणा
- 3 वर्षात 400 नवीन वंदे भारत ट्रेन बनवणार
- 5 नदी जोड प्रकल्पाचा डीपीआर तयार
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai