नेलपॉलिश काढण्यासाठी रिमूव्हरची गरज नाही
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 10, 2022
- 668
आपल्याला लग्न समारंभ किंवा पार्टीसाठी तयार होताना मॅचिंग ड्रेसचा नेलपेंट लावायचा आहे. पण अशा वेळी आपल्या कडील नेल पेंट रिमूव्हर संपला असेल तर काय कराल? अशा स्थितीत बहुतांश स्त्रिया नखं कोरून त्यावरील नेलपॉलिश काढू लागतात. पण अशा या सवयी मुळे नखे खराब होतात आणि त्यांची चमक देखील कमी होते. अशा परिस्थितीत नेलपेंट रिमूव्हर न वापरताही नखांची चमक टिकवून ठेवण्यासह या उपायांचा अवलंब करून आपण नखांमध्ये आधीच असलेली नेलपॉलिश काढून टाकू शकता.
1 टूथपेस्ट- टूथपेस्ट मध्ये असलेले इथाइल एसीटेट नखे स्वच्छ करण्यास मदत करते. यासाठी आपण टूथपेस्ट आणि जुना टूथब्रश घ्या. यानंतर नखांवर टूथपेस्ट लावा, ब्रश ओला करून नखांवर घासून घ्या. ब्रश फक्त नखांवर घासा त्वचेवर घासल्याने आपली त्वचा सोलवटू शकते. असे केल्याने नखांवरचा नेल पेंट निघून जाईल.
2 लिंबू आणि व्हिनेगर- नेल पेंट काढण्यासाठी व्हिनेगर आणि लिंबू देखील खूप प्रभावी उपाय आहेत. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात 10 ते 15 मिनिटे बोटे बुडवून ठेवा. यानंतर एका भांड्यात दोन चमचे लिंबाच्या रसात व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने नखांवर लावा. असं केल्याने नखावरील नेल पेंट सहजपणे निघून जाईल.
3 हेअर स्प्रे- हेअर स्प्रेमध्ये असलेले रबिंग अल्कोहोल नेल पेंट काढण्यास खूप मदत करते. यासाठी नखांवर हेअर स्प्रे फवारल्यानंतर कापसाच्या साहाय्याने नखे हळुवार घासून स्वच्छ करा. काही वेळाने आपली नखे स्वच्छ होतील.
4 सॅनिटायझर- नेल पेंट काढण्यासाठी हँड सॅनिटायझरचाही वापर केला जाऊ शकतो. सॅनिटायझरमध्ये असलेले रबिंग अल्कोहोल नखे स्वच्छ करण्यास मदत करते. हा उपाय करण्यासाठी, सर्वप्रथम, कापसाच्या बॉलवर सॅनिटायझर लावा आणि नखांवर 3 ते 4 वेळा घासून घ्या. असे केल्याने नखांवरील नेल पेंट निघून जाईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai