मनसेचे शिवजनसंपर्क अभियान
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 19, 2022
- 613
नवी मुंबई : महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवापासून नवी मुंबई शहरात 19 फेब्रुवारी ते 02 मार्च या कालावधीत मनसे आयोजित शिवजनसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार आहे.
या अभियाना अंतर्गत सुमारे दीड ते दोन लाख नवी मुंबईकरांशी थेट संवाद व 20 ते 25 हजार नवी मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणार असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. तसेच नवी मुंबईतील सर्व मनसे शाखेतील महाराष्ट्र सैनिक रक्तदान शिबिरात अथवा नजीकच्या रुग्णालयात जाऊन रक्तदान करून छत्रपती शिवरायांना मानवंदना देणार आहेत.
20 फेब्रुवारी रोजी मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते नेरूळ, जुईनगर व घणसोली या प्रभागांमध्ये मनसे शाखांचे उद्घाटन करून शिवजनसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियाना अंतर्गत मनसेच्या वतीने नवी मुंबईत विविध ठिकाणी शिवगारद स्पर्धा, शिव व्याख्यान, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, मिरवणुका व विविध सांस्कृतिक कार्यक्रम, दांड पट्टा व कसरती, मनसे वृत्तपत्र वाचनालय उद्घाटन, आधार कार्ड मोबाईल लिंक शिबिर, पंतप्रधान जनधन खाते योजना, रेशन कार्ड शंका निवारण शिबिर, लाईट बिल आणि मालमत्ता कर शिबिर, ई श्रम कार्ड शिबिर, व प्रत्येक मनसे शाखेत शिवजयंती उत्सव साजरा करणार असल्याचे मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले व सविनय म्हात्रे यांनी सांगितले.
या शिवजनसंपर्क अभियाना अंतर्गत नवी मुंबई शहरातील महिला भगिनी, विविध बचत गट, तरुण युवक मंडळे, पर्यावरणप्रेमी, डॉक्टर, अधीवक्ते, वास्तूविशारद, अभियंते, तसेच कला क्षेत्रातील मंडळी, कामगार वर्ग, तसेच बुद्धिजीवी लोकांशी थेट भेटून त्यांचे शहर विकासाबाबत संकल्पना, विचार व दृष्टिकोन जाणून घेतले जाणार आहेत. नवी मुंबईकरांनी मनसेच्या या शिवजनसंपर्क अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गजानन काळे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai