भारत-फ्रान्स बंदर व्यापार मजबूत होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2022
- 625
फ्रान्सच्या परिवहन मंत्र्यांची जेएनपीएला भेट
मुंबई : फ्रान्सचे वाहतूक मंत्री जॉन बातिस्ते जेब्बारी यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) या प्रमुख कंटेनर बंदरास भेट दिली. या भेटीमुळे भारत-फ्रान्स दरम्यान जमीन, हवाई आणि सागरी वाहतुकसंबंध अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत दिले आहेत. आपल्या भेटी दरम्यान फ्रान्सच्या वाहतूक मंत्र्यांनी ब्लू इकॉनॉमीच्या संयुक्त मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करून भारतीय बंदरे आणि लॉजिस्टिक व्हॅल्यू चेन विकसित करण्यासाठी फ्रेंच कंपन्या देत असलेल्या योगदानावर चर्चा केली.
जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी फ्रान्सचे परिवहन मंत्री जॉन बातिस्ते जेब्बारी व इतर फ्रेंच प्रतिनिधींचे पारंपारिक स्वागत केले. फ्रान्सचे परिवहन मंत्री आणि इतर प्रतिनिधींशी संवाद साधताना जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शारद वाघ म्हणाले, जेएनपीए पायाभूत सुविधा व सागरी वाहतूक सुविधा विकसित करताना शाश्वत उपायांवर भर देते व प्रोत्साहन देते, ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक कार्यामध्ये अर्थपूर्ण सहभाग सक्षम होतो. जेएनपीएने विविध मल्टी-मॉडल सुविधा आणि प्रकल्प विकसित केले आहेत ज्याचा आमच्या ग्राहकांना आणि भागधारकांना लाभ होत आहे.
भारत-फ्रेंच संबंधांबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, भारत व फ्रान्स या दोन्ही देशांचा सागरी व बंदर क्षेत्रातील प्रगतीशील उत्कर्षामध्ये रस असून दोन्ही देश व्यापारी भागीदार आहेत. जेएनपी प्राधिकरणाने फ्रान्सच्या प्रतिनिधि मंडळासमोर सादरीकरणाद्वारे जेएनपीएमधील विविध प्रकल्पांची माहिती दिली. प्रतिनिधी मंडळाने प्रत्यक्ष बंदर क्षेत्राचा दौरा केला व बंदरातील एकूण कामकाज आणि बंदरातील अद्ययावत विकासकामांची व सुविधांची माहिती घेतली. आपल्या भेटी दरम्यान फ्रान्सचे परिवहन राज्यमंत्री जॉन बातिस्ते जेब्बारी यांनी जेएनपीएच्या हरित बंदर उपक्रमांची व शाश्वत विकासाच्या दिशेने केल्या जात असलेल्या उपायांची प्रशंसा केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai